धक्कादायक प्रकार.. जत तालुक्यात प्रेमी युगलाची आत्महत्या
सांगली : जत तालुक्यातील रामपूर या ठिकाणी एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली आहे.
विवाहित महिलेने गळफास घेऊन तर तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेबाबत घातपात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रामपूर गावातल्या कोळेकर वस्ती या ठिकाणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येचा प्रकार घडलेला आहे. उमेश अशोक कोळेकर असं मृत तरुणाचं तर प्रियंका बाळासाहेब कोळेकर असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे.
गावातल्या कोळेकर वस्तीवरील शेतानजीक असणाऱ्या ओढ्याजवळ उमेश कोळेकर याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्याशेजारी विषारी औषधाची बाटली देखील सापडली आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रियंका बाळासाहेब कोळेकर या विवाहात महिलेने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला आहे.
दरम्यान, मृत विवाहित महिला महिला प्रियांका कोळेकर हिने जत पोलीस ठाण्यामध्ये मृत उमेश कोळकर याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
या सर्व घटनेनंतर या दोघांच्याही आत्महत्येचा प्रकार घडला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पुढील सर्व गोष्टी स्पष्ट होईल, अशी माहिती जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांनी दिली आहे.


0 Comments