खबरदार! संप केलात तर परिणाम भोगावे लागतील केंद्र सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा
नवी दिल्ली कोणतेही 1 आंदोलन, संप, विरोधी प्रदर्शनात सहभागी होऊ नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांनी देशभरातील जिल्हा पातळीवर आंदोलन करण्याची योजना आखल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा इशारा देण्यात आला आहे.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने सोमवारी यासंदर्भात केंद्र सरकारच्या सर्व विभागांच्या सचिवांना यासंदर्भातदिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेणे, कामबंद आंदोलन करणे यांसह कोणत्याही प्रकारच्या संपात सहभागी होऊ नये,
असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचा अधिकार देण्याची कोणतीही घटनात्मक तरतूद नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या अनेक निर्णयांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आक्षेप नोंदवला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाणे हे वर्तणूक नियमांचे उल्लंघन आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची भूमिका न्यायालयाने मांडली असल्याचे केंद्राच्या आदेशात म्हटले आहे. आंदोलन, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचान्यांवर वेतन कपातीसह योग्य ती दंडात्मककारवाई करण्यात येईल,
असा इशारा सरकारने दिला आहे. डीओपीटी प्रत्येक सरकारी विभागाला संप आंदोलन, विरोध-प्रदर्शनात सहभाग होणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती साठ करण्याचे निर्देश दिले आहेत
सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्री संयुक्त कृती परिषदेने जुनी पेन्श योजना लागू करण्याच्या मागणीसा 'ज्वाइंट फोरम फॉर रिस्टोरेशन ऑ ओल्ड पेन्शन स्कीम' या बॅनरखाल देशभरात जिल्हा पातळीवर स आयोजित करण्याची योजना तथा केली आहे.


0 Comments