पुणे येथे आ. रवींद्र धंगेकर यांचा डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न
सांगोला कोळा (वार्ताहर):- पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाचे अटीतटीच्या लढतीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांचा शेकाप च्या वतीने
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी जनतेसाठी केलेले काम यांचा आदर्श ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरिबासाठी समाजकारण राजकारण करणार असल्याचे विचार आमदार रवींद्र दंगेकर यांनीव्यक्त केले.
पुणे येथे महानगरपालिकेच्या आवारात आमदार रविंद्र धंगेकर व डॉ बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट झाली. यावेळी पुणे कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मोहन जोशी,
रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष उद्योगपती इंजिनिअर अशोक आबा नरळे फलटणे, माजी नगराध्यक्ष मधुकर कांबळे, भाई रफिक तांबोळी, पुणे पणन अधिकारी कर्मचारी मंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अध्यक्ष सुभाष करांडे, पत्रकार जगदीश कुलकर्णी, यांच्यासह आदी उपस्थित होते.


0 Comments