google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात नाझरे येथे सांगोला पोलीसानी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

Breaking News

सांगोला तालुक्यात नाझरे येथे सांगोला पोलीसानी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

 सांगोला तालुक्यात नाझरे येथे सांगोला पोलीसानी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

नाझरा येथील बेलवण नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिसांनी पकडला. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ८ हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा ३ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

 याप्रकरणी पो. कॉ. निशांत सावजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव सोमनाथ पेशवे रा. नाझरा ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या आदेशाने स. पो. काटकर, पो. ना. विजय थिटे, पो. ना. निबांळकर,पो. कॉ. वाघमोडे, पो. कॉ. निशांत सावजी असे नाझरादुरक्षेत्र हद्दीत पेट्रोलींग करीत असताना बेलवन नदीच्या पुलाजवळ अवैध वाळू भरुन एक ट्रॅक्टर नाझरा गावाकडे जात असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली. 

त्या आधारे पोलीस बातमीच्या ठिकाणी जात असताना नाझरा मठ ते नाझरा रोडने बेलवन नदीच्या पुलाजवळ एम. एच. २७ एल ४७९० या ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने दिली आहे.

ट्रॅक्टर न थांबवता भरधाव वेगाने घेवून गेला. पोलिसांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करून चालक महादेव सोमनाथ पेशवे रा. नाझरा ता. सांगोला यास ताब्यात घेतले. पोलिसांनीट्रॅक्टरची पाहणी केली असता त्यात एक ब्रास वाळू आढळून आली.

 या कारवाईत पोलिसांनी ३ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ८ हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा ३ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पो. कॉ. निशांत सावजी यांनी ट्रॅक्टर चालक महादेव सोमनाथ पेशवे रा. नाझरा ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments