Breaking News

धक्कादायक... सोलापूरमध्ये दिवसा ढवळ्या दुचाकीला आग लावली, लावणाऱ्यावर गुन्हा.

धक्कादायक... सोलापूरमध्ये दिवसा ढवळ्या दुचाकीला आग लावली, लावणाऱ्यावर गुन्हा. 

स्मार्ट सिटी समजले जाणारे सोलापूर -घरासमोर लावलेली दुचाकीला अज्ञात इसमाने पेटविल्याची घटना न्यू पाच्छा पेठ येथे दिवसा ढवळ्या घडली.याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत श्रीनिवास बाबुराव चौगुले ( वय ३६, रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक) यांनी फिर्याद दिली आहे

फिर्यादी श्रीनिवास चौगुले यांनी आपल्या राहत्या घरासमोर आपली दुचाकी पार्क केली हाेती. शनिवारी दुपारी एक ५५ ते ६० वर्षाचा काळा टीशर्ट घातलेल्या इसमाने गाडीला आग लावली. 

यात गाडी जळून गाडीचे ६० हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चौगुले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई बादोले करत आहे अशी सुत्रा करून मिळालेली माहिती.

Post a Comment

0 Comments