'कानून के हाथ लंबे होते है' पत्नीचा खून करून बनला भिकारी, पोलिसांनी २८ वर्षांनी आवळल्या मुसक्या !
पत्नीचा खून करून भिकारी बनला आणि आपली ओळख लपवत राहिला परंतु पोलिसांनी तब्बल २८ वर्षानंतर त्याला नेमका हेरला आणि त्याच्या मुसक्या आवळून त्याला गजाच्या आड रवाना करण्यात आले.
गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवस पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतात असा आजवरचा अनुभव आहे. गुन्हेगार गुन्हा करून आपली ओळख लपविण्यासाठी विविध युक्त्या करीत असतो,
पोलिसापासून दूर राहण्यासाठी त्याची अखंड धडपड सुरु असते आणि काही काळ तो पोलिसांना हुलकावण्या देण्यात यशस्वीही होतो परंतु कधी न कधी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकत असतो. त्याच्या हुशारीमुळे पोलिसांच्या हाती लागण्यात विलंब झाला तरी तो एक दिवस हमखास गजाआड जात असतो.
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अशाच एका फरार आरोपीचा शोध तब्बल २८ वर्षांनी लावला असून पोलिसांचे मोठे कौतुक होऊ लागले आहे. आपल्या पत्नीचा खून करून नुरूल्ला खान हा आरोपी फरार झाला होता आणि ओळख लपवून पोलिसांना गुंगारा देत होता.
नुरूल्ला खान हा भिकारी बनून आपले आयुष्य काढत होता तर पोलीस त्याचा शोध घेत होते. खून करून २८ वर्षे त्याने पोलिसांना गुंगारा दिल्यामुळे आता आपण पोलिसांना सापडू शकत नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला पण पोलिसांनी २८ वर्षांनी त्याच्या मुसक्या अखेर आवळल्याच !
गुन्हे करून पसार झालेल्या फरारी आरोपींचा शोध घेण्याची एक मोहीमच अमरावती ग्रामीण पोलिसांनी हाती घेतली आणि याच मोहिमेत आरोपी नुरुल्ला खान वजीरउल्ला खान याच्यापर्यंत पोलीस पोहोचले
आणि तब्बल २८ वर्षे पोलिसांना हुलकावणी देत असलेला आरोपी पोलिसांच्या हाती लागला. नुरुल्ला खान वजीरउल्ला खान याने २८ वर्षांपूर्वी आपल्या पत्नीचा खून केला होता आणि पोलिसांनी पकडण्याच्या आधीच तो पळून गेला होता.
त्यानंतर त्याने पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी मोठी युक्ती केली आणि रस्त्याच्या कडेला भीक मागायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचे रूपही बदलले गेले आणि तो कुणाला सहजासहजी ओळखताही येत नव्हता. पोलीस त्याचा शोध घेत होते पण आरोपी मात्र रस्त्यालगत ठाण मांडून भीक मागत होता.
त्यावर त्याचा उदरनिर्वाहही होत होता आणि पोलीसानाही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. तब्बल २८ वर्षे उलटली पण तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पोलिसांनी नव्याने शोध मोहीम हाती घेतल्यानंतर पोलिसांच्या कानावर त्याच्याबद्धल काही माहिती आली.
नुरुल्ला खान हा २८ वर्षांपासून फरार असलेला आरोपी ट्रान्सपोर्ट नगर येथे रहात असून तो रस्त्याच्या कडेला भीक मागत असतो याची माहिती पोलिसांना मिळाली.
तबल २८ वर्षे गुंगारा देत असलेला खुनातील आरोपी असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनी तडक या रस्त्याकडे धाव घेतली. नुरुल्लाचे रूप पूर्णपणे बदलून गेले होते.
एवढ्या वर्षानंतर त्याला सहज ओळखणे देखील पोलिसांच्या पुढे आव्हान होते पण एकदा माहिती मिळाली आहे म्हटल्यावर पोलिसांनी आपल्या सर्व युक्त्या आणि कौशल्य वापरले आणि बरोबर नुरुल्लाच्या जवळ पोहोचले.
पत्नीची हत्या करून तब्बल २८ वर्षे पोलिसांना हुलकावणी देणारा नुरुल्ला भीक मागत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि गजाआड केला. 'कानून के हाथ लंबे होते है' याचा अनुभव पुन्हा एकदा आला असून पोलिसाने कौतुक होऊ लागले आहे.
0 Comments