google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कलाकार मा.प्रमोद न.सूर्यवंशी यांच्या वाढ दिवसानिमित्त राज्यस्तरीय तिसरे महाकवी संमेलन कांदिवली ,मुंबई येथे संपन्न

Breaking News

कलाकार मा.प्रमोद न.सूर्यवंशी यांच्या वाढ दिवसानिमित्त राज्यस्तरीय तिसरे महाकवी संमेलन कांदिवली ,मुंबई येथे संपन्न

कलाकार मा.प्रमोद न.सूर्यवंशी यांच्या वाढ दिवसानिमित्त राज्यस्तरीय तिसरे महाकवी संमेलन कांदिवली ,मुंबई  येथे संपन्न

सांगोला प्रतिनिधी/समाधान मोरे.

इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन आणि लयभारी साहित्य समुह आयोजित काव्यदर्पण ई -बुक  काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा  आणि लय भारी समुहाचे संस्थापक कवी - प्रमोद सुर्यवंशी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय तिसरे कवी संमेलन म.न.पा. शाळा आकृर्ली -  कांदिवली मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला 

राज्यातील विविध भागातून नामवंत कवी /कवियत्री यांनी आपल्या बहारदार काव्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले .

कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे संमेलन उदघाटक मा.श्री मदन गोवारी ,रायगड भूषण महादेव रायबान, मा. स्नेहल देव, 

संमेलन अध्यक्ष ,मा.श्री.विठ्ठल घाडी आशाताई ब्राम्हणे

इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन संस्थेचे मा.श्री.एन डी. खान सर, मा.सलमा खान 

काव्यदर्पणच्या संपादिका सौ.आशा ब्राह्मणे या उपस्थित होत्या.

कांदिवली आर पी आय अध्यक्ष मा.सर्जेराव शिरसाठ यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सौ.छाया साखरे, श्री.दिनेश कवडे, मा.श्री.संतोष रायबान (धुरळा फेम कविता सोलापूर)  

आमचे मार्गदर्शक लयभारी साहित्य समूहाचे संस्थापक श्री.अनिल केंगार सर यांचा सौ.रंजना मांगले यांचा सत्कार करण्यात आला 

 सौ.आशाताई ब्राम्हणे , अशोक ब्राम्हणे  आणि सौ.विनिता कदम श्री.ताराचंद कदम आणि प्रमोद सुर्यवंशी यांनी कवी संमेलनाचे नियोजन करून सगळ्यांना लयभारी कवितांचा रसिक प्रेक्षकांना भरभरून आनंद घेतला

कवितिंची मैफिल आणि जेवणाचा आस्वाद घेऊन सर्वानी मनमुराद आनंद घेतला

 काव्यदर्पण या इ बुकचे प्रकाशन मा.मदन गोवारी, मा.विलास देवरूळकर मा.विठ्ठल घाडी, 

काव्यदर्पण इ बुक साठी विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे 

कवियत्री / लेखिका मा. मीनाताई शेळके रा . संगमनेर यांनी

काव्यदर्पण इ बुक साकार करण्यासाठी  खूप मेहनत घेतली 

मा.एन डी. खान, मा.सलमा खा,मा.आशा ब्राम्हणे, मा.विठ्ठल घाडी, यांनी मूलभूत सहकार्य लाभले.

 कवयित्री मा.भावना पाटील आणि वंदना पाटील उत्कृष्ट सूत्रसंचालन करून कार्यक्रम रंगदार बहारदार केला .

कवी संमेलनात ६० कवी/कवयित्री यांनी सहभाग घेऊन कविता सादरीकरण करून कवी संमेलन गाजवलं 

 शाळेचे स्वयंमसेवक लक्ष्मण देशमुख सरांनी खूप सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments