धक्कादायक घटना ! सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी; आणखी एका महिलेचा मृत्यू
सोलापूर गेल्या पंधरा दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, आठ दिवसात या आजाराने आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.सोलापूर शहरात रविवारी दिवसभरात विविध रुग्णालयात १८ संशयीतांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही.
जुळे सोलापूर परिसरातील बंडे नगर येथील ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांना उलटी आणि तापामुळे दि.११ मार्च रोजी अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
गेल्या दोन दिवसात त्यांचा आजार बळावला. उपचार सुरू असताना १७ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. गेल्या आठवडयातच एका महिलेचा मृत्यू झाला होता.
यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दोघा महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.सध्या शहरात १३ पुरुष आणि १७ महिला असे ३० जण अॅक्टिव्ह रुग्ण तर ग्रामीण भागात 8 रुग्ण असून त्यांच्यावर घरातच विलगीकरण करण्यात येऊन उपचार सुरू आहेत.


0 Comments