google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून ६३ हजाराचा ऐवज लंपास केला

Breaking News

सांगोला शहरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून ६३ हजाराचा ऐवज लंपास केला

 सांगोला शहरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून ६३ हजाराचा ऐवज लंपास केला

 सांगोला / प्रतिनिधी घरात कोणीच नसल्याचे पाहून दरवाजास लावलेले कुलूप, कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण ६३ हजार चोरी केली. 

ही घटना २६ फेब्रुवारी रात्री ११ ते २७ फेब्रुवारीच्या रात्रीत मस्के कॉलनी एखतपूर रोड, सांगोला येथे घडली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

 सांगोला महावितरण मध्ये कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारे सुरेश भीमराव करे मूळ गाव नंदेश्वर ता. सांगोला सद्या (रा. मस्के कॉलनी, सांगोला) यांची पत्नी २३ फेब्रुवारी रोजी माहेरी गेली होती. 

त्यामुळे फिर्यादी हे एकटेच असल्याने दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून गावी नंदेश्वर येथे गेले होते.

 दुसऱ्या दिवशी (दि. २७ रोजी) फिर्यादी हे सांगोला येथील घरी सकाळी ११ वाजता आले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाज्याचे कुलूप, कडी, कोयंडा तुटलेले दिसले.

 त्याचा बरोबर लाकडी कपाटाच्या ड्राव्हर मधील ३० हजार रुपये किमतीची हिरे जडीत ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १२ हजार रूपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याचे झुमके, ६ हजार रुपयाची २ ग्रॅम सोन्याची अंगठी व १५ हजार रुपये रोख असा एकूण ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी चोरून नेल्याची लक्षात आले.

Post a Comment

0 Comments