सांगोल्यातील १४६ चारा छावण्यांच्या २२ कोटीसाठी छावणी चालकांना महसूल मंत्र्यांचे उंबरडे झिजवावे लागणार !
सांगोला / प्रतिनिधी २०१९ च्या दुष्काळामध्ये सुरू करण्यात आलेल्या जनावराच्या छावण्याची देवकासाठी तब्बल ५ वर्षांनंतरही सरकारने तरतूद केली नाही. उलट ५ वर्षांनंतर या छावणी चालकांना दंडाच्या नोटिसा महसूल खात्याकडून बजावण्यात आल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
चारा छावण्या सुरू केल्यानंतर अटीच्या पूर्ततेसाठी दररोज महसूल खात्याच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी केली जात होती, तरीही महसूल प्रशासनाने छावणीचालकांना दंडाची आकारणी केली. सुरुवातीच्या काळात ३०० जनावरांची अट घातली.
त्यामुळेतेवढी संख्या होईपर्यंत छावणी चालकाला पदरमोड करावी लागली. त्यानंतरची संख्या ग्राह्य धरण्यात आली आणि बंद करतेवेळी कमी झालेली जनावरे झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी छावण्या बंद करू नयेत अशी सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यामुळे छावणी चालकांनी कमी जनावरे देखील स्वखर्चाने जतन केले आणि त्यामुळे कमी जनावरे संख्या महसूल खात्याने प्राह्य धरण्यात आली नसल्याची ओरड सुरू झाली. छावण्या बंद करण्याचा अंतिम टप्प्यातमंगळवेढा व सांगोला या तालुक्यातील जवळपास कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत.
जनावरे जतन करण्यासाठी उधारीवर तलवा चारा, पशुखाद्य व इतर खर्चाची देवके छावणी चालकांना देणेकराच्या दररोजच्या तगाद्यामुळे स्थानिक संस्था व बँकांची कर्ज काढून अदा करावी लागली.
अशा परिस्थितीत सध्या तब्बल वर्षानंतर अडकलेले ि म्हणून छावणी चालकांनी सरकारच्या अनेक मंत्र्यांच्या दालनाचे उंबरठे झिजवली परंतु अद्याप बिले अदा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही
सांगोला तालुक्याचाविचार केला तर एकूण १४६ चारा छावण्या सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये दाखल होत्या.त्यामध्ये १४६ चारा छावणी चालकावरती त्यावेळी घेतलेल्या उधारीमुळे विकटची परिस्थिती दरम्यानच्या कालावधीमध्ये आली होती.
१३१ कोटी ची मागणी शासनाकडे असता आजतागायत सांगोला तहसील कार्यालयाकडून१०९ कोटी रुपये सांगोला तालुक्यातील १४६ चारा छावण्याना वाटप झाल्याची माहिती आहे. त्यानुसार अजून आज तागायत २२ कोटी रुपयेसांगोला तालुक्यातील छावणी चालकांना वाटप करण्याचे शिल्लक आहे
परंतु हे २२ कोटी रुपये कधी मिळतील यावरती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सांगोला तालुक्यामध्ये १४६ चारा छावण्या होत्या. त्यांच्या मागणीनुसार १३१ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते परंतु आज तागायत सांगोला तहसील कार्यालयाकडून १०९ कोटी रुपये वाटप झाले आहे.
उर्वरित अजून २२ कोटी रुपये तालुक्यातील चारा छावण्यांचे वाटणे बाकी आहे. या बावीस कोटीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. हे काम आता रामभरोसे !


0 Comments