म.फुले आंबेडकर सार्वजनिक वाचनालय डिकसळमध्ये मराठी भाषा गौरव दिन वि. वा. शिरवाडकर जयंतीचे औचित्य साधून विविध सत्कार मूर्तीचा सत्कार संपन्न
सांगोला तालुक्यातील डिकसळ गावातील राजकिय, शैक्षणिक, शेती, व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्वकतृत्वाने स्वतःच्या गावचे नाव उज्वल करण्यार्या सत्कार मुर्तीचा सत्कार वाचनालयास मराठी भाषा गौरव दिन व कवि शिरवाडकर. यांच्या जयंतीचे अवचित साधून संपन्न झाला कवी शिरवाडकर यांच्या प्रथमेश चे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकला बाबर मॅडम, वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब भुसनर सर, सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संतोष करांडे यांनी म्हणाले की त्या सर्व सत्कारमूर्ती अत्यंत प्रतिकुल परस्थितीतून यशाच्या शिखरा
पर्यंत पोहचल्या आहेत. श्री तुकाराम भुसनर सर यांनी सांगोला तालुका खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झालेली आहे तर राजेंद्र कांचन कोटी संघटना आदर्श शिक्षक पुरस्कार CBS म्यूज तर्फे देण्यात आलेला आहे. आदर्श प्रगतशील
बागायतदार शेतकरी पुरस्कार श्री सोपान कृष्णा करांडे यांना मिळालेला आहे.डिसकळ गावचे पोलिस पाटील अनिल कुलकर्णी यांची मुलगी आसावरी अत्यंत परिश्रमातुन इंजिनियर होऊन चांगला जॉब मिळवला आहे.धनराज करताडे, यांची मुलगी सुवर्णा Msc पूर्ण करत आहे.अनिल बळवंत कुलकर्णी यांची ही मुलगी पल्लवी इंजिनिअर होऊन चांगला जॉब मिळवला आहे अशा सर्वांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
श्रीपाद कुलकर्णी सरांनी मराठी भाषेचे महत्व पटवून दिले. कवी वि.वा शिरवाडकर यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला काही कविताही ऐकविण्यात आल्या क वि व्हायचेय तुकाराम भुसनर सर यांनी मनोगत व्यक्त केले
म. फुले आंबेडकर सार्वजनिक वाचनालय डईसकळ अध्यक्ष बाळू भुसनर सर उपाध्यक्ष संतोष करांडे माजी चेअरमन बाबासाहेब कोरे, पोलीस पाटील अनिल कुलकर्णी,
श्रीमंत निळे, अमृत निळे, पिराजी वाघमोडे, विश्वास यादव, शशिकला बाबर मॅडम, अपूर्णा कुलकर्णी अवदुत
कुळकर्णी, दयानंद करताडे यांचे सह अनेर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनिल गेजगे,संजय गेजगे यांनी खूप परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्षण बाळु भुसनर सर यांनी केले.


0 Comments