मंगळवेढा पाच जबरी चोरी गुन्हे उघडकीस १ लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त "पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची मोठी कामगिरी"
“मंगळवेढा : तीन गुन्ह्यातील जबरी चोरी व दोन चोरी असे एकूण पाच गुन्हे उघडकीस करुन सहा आरोपींकडून १ लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल मंगळवेढा पोलीसांनी जप्त केला.
सविस्तर माहिती अशी दि. १५/२०२२ रोजी भारत फायनान्स मधिल लोन ऑफिसर वैजनाथ जनार्दन शिंदे रा. मंगळवेढा भोसे येथून वेगवेगळ्या बचत गटाचे पैसे घेऊन येताना
सांगोला नाका पाटखळ रोड वरून येताना पाठीमागून युनिकॉर्न गाडीवर पाठलाग करून सांगोला नाक्याजवळ चाकूचा धाक दाखवून फिर्यादी जवळील ४५३५६ रुपये रोख व टॅब आणि बायोमेट्रिक मशिन हिसकवून गणेशवाडीच्या दिशेने पळून गेले होते
याबाबत भा द वी ३९२,३४ असा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यात आरोपींकडून रोख रक्कम २५०००, वापरलेली ७५००० रू. युनिकॉर्न मोटरसायकल असे एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २/२२ रोजी दुपारी मयूर महादेव पाटील राहणार डोंगरगाव यांची सम्राट दुकानासमोर एम एच १३ सीई ५३८८ जुपिटर मोटरसायकल लावलेली होती या डीकीमध्ये १ लाख रुपये रोख रक्कम कॅरीबॅग मध्ये ठेवली होती
बनावट चावीच्या साह्याने डीकी उघडून चोरून नेली होती. याबाबत ३ संशयित आरोपींना अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम ३५ हजार रुपये जप्त करण्यात आली.
दि. ११/२२ रोजी महादेव चिंटू लेंडवे रा. लेंडवे चिंचाळे घरात जेवण करून झोपले असताना रात्री अकराच्या दरम्यान अज्ञात दोन चोरट्याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारून खिशातील मोबाईल व पैसे तसेच पत्नीच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र २०००० रू किंमतीचे चोरून नेले असता
याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गोपनीय खबरेमार्फत माहिती घेऊन एका आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीकडून तीन ग्रॅम वजनाचे 15 000 रुपयाचे मणी जप्त करून अटक केली.
दि.१२/२२ रोजी पंढरपूर ते भाळवणी रोडवर दोन अज्ञात व्यक्तींनी येवून फिर्यादीच्या मोटरसायकलला लाथ मारून बॅग हिसकावून १,६८,२४० रू. रोख रक्कम व एक टॅब चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता
यामधील अटक केलेल्या आरोपीकडून जबरी चोरी १ मधे अधिक तपास केला असता केल्याची कबुली दिली व फिर्यादीने आरोपीची संगणमत करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
दि. १०/२२ रोजी दुपारी ४ वाजता नागणेवाडी मंगळवेढा तलावाच्या शेजारी असणाऱ्या ओपन जिमचे काही साहित्य लावलेले ठिकाणी नसल्याचे निदर्शनास आल्यावर वरिष्ठांना माहिती दिली व दोन लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी आरोपीकडून ४०, हजार रुपये किमतीचा माल जप्त केला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सो कोल्हापूर , पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे सोलापूर, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा सपोनी बापू पिंगळे पोहेकॉ दयानंद हेंबाडे, हजरत पठाण, सुनील मोरे,अजित पिसाळ ,अजय शिंदे,वैभव घायाळ यांच्या टीमने कौशल्यपूर्ण तपास करून चांगली कामगिरी केली .


0 Comments