google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आबासाहेबांच्या निधनानंतर‌ नेत्यांमध्ये बेजबाबदार पणा वाढला नाही...तर,काही विघ्नसंतोषी लोक संभ्रम निर्माण करतात.भाई अनिल‌ सातपुते

Breaking News

आबासाहेबांच्या निधनानंतर‌ नेत्यांमध्ये बेजबाबदार पणा वाढला नाही...तर,काही विघ्नसंतोषी लोक संभ्रम निर्माण करतात.भाई अनिल‌ सातपुते

  सांगोला तालुक्यात आबासाहेबांच्या        निधनानंतर‌ नेत्यांमध्ये   बेजबाबदार पणा वाढला नाही...

तर,काही विघ्नसंतोषी लोक संभ्रम निर्माण करतात.भाई अनिल‌ सातपुते

सांगोला प्रतिनिधी स्व.आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर सांगोला तालुक्यातील जनता खचली होती.चिंतेत होती...कारण त्यांचा आधार नाहीसा झाला होता.परंतु आशा अडचणीच्या काळात स्व आबासाहेबांचे नातु 

डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला व वैद्यकीय शिक्षण पुर्ण होऊन ही त्यांनी स्व आबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला व जनसेवेचा वसा अविरत चालू ठेवला...

    शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने सुध्दा राज्यच्या पुरोगामी युवक संघटनेचे जबाबदारी त्यांच्यावर टाकुन त्यांना पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली.व डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी पनवेल ,गडचिरोली येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात आपल्या वक्तव्याने जनमनावरती ठसा उमटवला.

   स्व आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर रोजच्या रोज आबासाहेबांच्या निवासस्थानी गर्दी होत आहे.. वेगवेगळ्या गावचे अनेक लोक डॉ बाबासाहेब देशमुख‌ यांना कामानिमित्त भेटण्यासाठी येत आहेत.रोजच्या रोज लोकांची गाऱ्हाणी ऐंकुन घेतली जात आहेत...व पुंन्हा एकदा आबासाहेबांचे निवासस्थान बाबासाहेबांच्या उपस्थितीने गर्दीने फुलू लागले आहे.लोकांना हायसे वाटु लागले आहे..

भाई बाबासाहेब देशमुख कोणाचाही सुख दुःखाचा कार्यक्रम असो ते आवर्जून उपस्थित राहुन त्यांच्या सुख दुःखात सामील होत आहेत..

लोकांनाही डॉ बाबासाहेब देशमुख‌ यांच्या रुपात आबासाहेब दिसत आहे.लोकांमध्ये उस्ताह संचारला आहे.डाॅ.बाबासाहेब देशमुख हे सुध्दा दिवसातुन चौदा-पंधरा तास काम करीत आहे..एवढे काम करणारा व जनसंपर्क ठेवणारा दुसरा युवा नेते‌ आजतरी जिल्ह्यात पाहावयास मिळत नाही...

   शेतकरी कामगार पक्षाचे आचार,विचारा वरती डॉ बाबासाहेब देशमुख‌ हे वाटचाल करीत असताना जनतेच्या मनामध्ये त्यांच्या बद्दल सहानुभूती असताना व कोरोना काळात अनेकांचे प्राण वाचवले असताना संकट काळी मदतीस धावून येणारा

 हा युवा नेते आजही  कोणाचाही फोन आला तर तो फोन उचलुन प्रतिसाद देत आहे...व सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील  कितीतरी जेष्ठ व‌‌ तरुण नेते‌ कार्यकर्ते यांना ते नावानीशी ओळखत आहेत...हे विशेष आहे..

   आसे असताना शेतकरी कामगार पक्षातील काही जेष्ठ व युवा नेते डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या बद्दल जर भावी नेते म्हणत असतील तर ..हे चुकीचे नाही...ही जनभावना आहे...

मात्र काही विघ्नसंतोषी लोक उगीचच देशमुख कुटुंबाचा आधार घेऊन त्यांच्यात संभ्रम निर्माण करीत आहेत.. पक्षामध्ये अल्पसंख्याक समाजातील नेते  कार्यकर्ते जर‌ पक्षाचे काम प्रामाणीक पणे पुढे येऊन करीत असतील

 व जनमानसातील भुमीका जाहीर करीत असतील तर काहींची गैर नाही....उगीचच स्वताच्या फायद्यासाठी उगीचच संभ्रम निर्माण करीत आहे..आशा पासुन  सावध रहावे..असे मत  शेंडगेवाडीचे युवा नेते‌ भाई अनिल सातपुते यांनी‌‌ व्यक्त केले

Post a Comment

0 Comments