google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्नीला डिलिव्हरी करण्यासाठी तिला सोबत घेऊन निघाला पती , रस्त्यातच चालत्या कारला आग

Breaking News

पत्नीला डिलिव्हरी करण्यासाठी तिला सोबत घेऊन निघाला पती , रस्त्यातच चालत्या कारला आग

 पत्नीला डिलिव्हरी करण्यासाठी तिला सोबत घेऊन निघाला पती , रस्त्यातच चालत्या कारला आग

कन्नूर : हॉस्पिटलजवळ कारला लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा भीषण मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला गर्भवती होती, तिला घरी प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला घेऊन तिचा पती कारमधून हॉस्पिटलकडे निघाला होता. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ते जात असलेल्या चालत्या कारला अचानक आग लागली.

 त्यात या गर्भवती महिला आणि तिच्या पतीचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. २ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. आता या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. कुणालाही हळहळ वाटेल असा हा प्रसंग केरळमध्ये कन्नूर जिल्हा रुग्णालयाच्या जवळ घडला.

या दुर्दैवी अपघातात ३२ वर्षांचा प्रजीत आणि त्याची २६ वर्षांची पत्नी रिशा हे मृत्युमुखी पडले आहेत. हे दोघेही कुट्टीयाथुर करंबुचे रहिवासी होते. हॉस्पिटलमध्ये रिशाला डिलिव्हरीसाठी नेत असताना अचावक कारने पेट घेतल्याने हा प्रकार घडला. कारमध्ये एकूण 6 प्रवासी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये दोघं जण पुढं बसले होते. तर एका मुलासह काही जण मागच्या सीटवर बसले होते. आग लागल्यानंतर मागे बसलेले उड्या मारुन बाहेर पडले, त्यामुळं त्यांचा जीव वाचला. ते आगीत होरपळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

ज्यावेळी गाडीला आग लागली त्यावेळी प्रजीत हा मागे असलेल्या लोकांना जीव वाचवण्यासाठी मदत करीत होता. मात्र त्याचवेळी हे पती पत्नी ज्या ठिकाणी बसले होते, त्या ठिकाणचे दरवाजे उघडत नव्हते. स्थानिकांनी दरवाजे उघडून या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या ज्वाळा जास्त येत असल्यानं या दोघांना वाचवण्यात अपयश आलं. 

नंतर दरवाजे तोडून मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं. या जलत्या कारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही स्थानिक या कारकडे धावताना दिसतायेत. मात्र कारमध्ये स्फोट होण्याच्या भीतीनं ते कारच्या जवळ जात नाहीत.

Post a Comment

0 Comments