धक्कादायक.. पार्टी करुन पंढरपूरच्या सुशांत खिलारे याचा केला खून आणि ----पंढरपूर तालुक्यातील घटना..
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सुशांत खिलारे याचा खून एकट्याने नव्हे तर काही जणांनी मिळून केला असून खून करण्याच्या आधी 'पार्टी' केली आणि नंतर सुशांतला मारण्यात आल्याची मोठी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील सुशांत खिलारे या तरुणाचा कराड येथे खून करून त्याचा मृतदेह अंबोली घाटात फेकून देण्यात आला होता
परंतु खून करणारा भाऊसो माने हा मृतदेह फेकत असताना तोल जाऊन घाटात कोसळला आणि त्याचाही मृत्यू झाला होता. यावेळी सोबत असलेला माने याचा मित्र तुषार पवार याने हा प्रकार समक्ष पहिला होता आणि त्यानेच माने याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांपर्यंत ही माहिती गेली आणि पोलीस घाटाकडे धावले.
यावेळी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील सुशांत खिलारे आणि त्याचा खून करणारा भाऊसो माने या दोघांचेही मृतदेह आढळून आले होते. सुशांत हा वीट भट्टीसाठी कामगार पुरवत होता आणि यातूनच झालेल्या देवाणघेवाणीतून सुशांतचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतानाच सगळी घटना उघडकीस आली.
हल्लेखोर माने याचा सहकारी तुषार पवार याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी माने आणि पवार याच्यावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला परंतु पोलीस तपासात आणखी मोठी माहिती समोर येत गेली आहे. हा खून एकट्या माने याने केला नसून यात आणखी काही जणांचा सहभाग असून पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.
घटना घडल्यापासून सावंतवाडी पोलीस अत्यंत सक्रीय झालेले असून त्यांनी बारकाईने या गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या तपासात या प्रकरणातील एकेक धागे उलगडू लागले असून आणखी काही जणांची नावे समोर आलेली आहेत. सावंतवाडी पोलीस या घटनेच्या मुलाशी जाऊन तपास करीत असल्याने एकेक माहिती पुढे येताना दिसत आहे.
खुनाच्या या घटनेत केवळ भाऊसो माने आणि तुषार पवार हे दोघेच नव्हते तर अन्य काहींचा समावेश होता हे पोलीस तपासात पुढे आले आणि पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मात्र या आरोपींचा समावेश नव्हता असे देखील पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मुकादम असलेल्या सुशांत खिलारे याचा खून करण्याच्या आधी कराड येथे निर्जन स्थळी एक पार्टी झाली होती आणि पार्टीच्या वेळीच सुशांत याला मारहाण झाली,
या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला आणि मग पुरावा नष्ट करण्यासाठी धावपळ केली गेली. यात प्रमुख आरोपी भाऊसो माने याचा देखील मृत्यू झाला. या पार्टीत दोघाव्यतिरिक्त आणखी काही जण असल्याची माहिती पोलीस तपासात तुषार पवार याच्याकडून उघड झाली आणि या घटनेतील आणखी महत्वाचा धागा उलगडला गेला.
कराड येथे निर्जन स्थळी करण्यात आलेल्या पार्टीत आबासो ऊर्फ अभय बाबासो पाटील (३८ रा. वाळवा, सांगली), प्रवीण विजय बळीवंत (२४, रा. वाळवा, सांगली), राहुल कमलाकर माने (२३, रा. कराड, सातारा), स्वानंद भारत पाटील (३१, रा. इस्लामपूर, सांगली),
राहुल बाळासाहेब पाटील (३१, रा. वाळवा, सांगली) यांचा समावेश असल्याची माहिती तुषार पवार याने पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी लगेच त्यानाही ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरु केला. सुरुवातीला या गुन्ह्यात केवळ दोघांचाच सहभाग असल्याचे समोर आले होते परंतु अधिक तपासात एकेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.
मोठी माहिती पोलिसांच्या हाती आली असली तरी पोलीस अजून खोलात जाऊन तपास करीत आहेत आणि या घटनेचा मुळापासून शोध घेत आहेत. सुशांत याचा खून करण्याच्या आधी निर्जन स्थळी झालेल्या पार्टीत सहभागी असलेल्या आरोपींची सगळी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे त्यामुळे हा तपास वेगाने पुढे जाताना दिसत आहे.


0 Comments