google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी घेतलं गौतमी पाटीलचं नाव, म्हणाले, "यापुढे आता.."

Breaking News

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी घेतलं गौतमी पाटीलचं नाव, म्हणाले, "यापुढे आता.."

 पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी घेतलं गौतमी पाटीलचं नाव, म्हणाले, "यापुढे आता.."

गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चांगलंच चर्चेत आहे. आपल्या डान्स स्टाईलमुळे प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याची टीका होत असते. 

राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला. 

मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली. 

यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. 

राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. 

राज्यात लावणींच्या नावाखाली अश्लील डान्सचे प्रकार वाढू लागल्याने आणि गावोगावी त्यांचं आयोजन केलं जात असल्यामुळे राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली आहे. 

अजित पवारांनी यावेळी लवकरच पक्षाकडून पत्रक काढून राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कळवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच लावणी कार्यक्रमासाठी सेन्सॉर लवकरात सुरू करण्याबाबत देखील प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

Post a Comment

0 Comments