google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगली तासगाव तालुक्यातील राखणदाराकडून दिव्यांग मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

Breaking News

सांगली तासगाव तालुक्यातील राखणदाराकडून दिव्यांग मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

 सांगली तासगाव तालुक्यातील राखणदाराकडून दिव्यांग मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

 तासगाव तालुक्यातील कुमठे गावातील दिव्यांग विद्यालयात राखणदार असणाऱ्या शिपायाने एका दिव्यांग मुलावर अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम राखणदार यास तासगाव पोलिसांनी अटक केली आहे.

 मिळालेली माहिती अशी की, रविवार दि. 5 रोजी रात्री साडेअकरा वाजता कुमठेयेथील जयशंकर निवासी दिव्यांग विद्यालय मध्ये सर्वजण झोपले असताना,

 नराधम शिपायाने दिव्यांग असलेल्या सहावी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला पाठीमागून मिठी मारली व त्याच्या तोंडावर हाताने दाबून अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन दिव्यांग हा जोर जोरात ओरडू लागला. तेव्हाआवाजाने एक दोन विद्यार्थी उठले,

 यावेळेस नराधमाने पीडित व त्याला वाचवण्यासाठी आलेल्या सहकारी दिव्यांग विद्यार्थी यांना मारहाण करून "कोणास सांगितले तर आणखी मारेन" अशी धमकीच दिली.याप्रकरणी नराधम शिपाई संदीप दत्तात्रय भोकरे (रा. तासगाव) याला अटक करण्यात आली आहे. 

संदीप भोकरे यांच्यावर भा. द. वि. कलम 377, 323, 506, सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5 (एफ), 5 के, 6, 8, 12 सह अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 चे कलम 92 प्रमाणे तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेतयाप्रकरणी तासगाव पोलीस

ठाण्याचे अधिकारी तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments