google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महापालिकेच्या इमारती आता स्वच्छ राहणार; व्यावसायिक संस्थेला साफसफाईचे काम देणार

Breaking News

महापालिकेच्या इमारती आता स्वच्छ राहणार; व्यावसायिक संस्थेला साफसफाईचे काम देणार

 महापालिकेच्या इमारती आता स्वच्छ राहणार; व्यावसायिक संस्थेला साफसफाईचे काम देणार

सोलापूर  - महापालिका आवारातील इंद्रभुवन, काउंन्सिल हॉल, प्रशासकीय इमारत तसेच हुतात्मा स्मृती मंदिर, डफरीन चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह या ५ इमारतीच्या साफसफाईचा मक्ता देण्यात येणार आहे.

साफसफाईची कामे करणाऱ्या व्यावसायिक संस्थेला ३ वर्षांसाठी हा मक्ता देण्यात येईल. यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी दिली.

महापालिका आवारातील अनेक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्याने महापालिका आवारातील प्रशासकीय इमारत व इतर कार्यालयांमध्येही अस्वच्छता पसरली आहे. शिवाय हुतात्मा स्मृती मंदिरातील अस्वच्छतेबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.

 यामुळे महापालिकेच्या या इमारती स्वच्छ सुंदर व नेटक्या दिसाव्यात या उद्देशातून आयुक्तांनी साफसफाईचा मक्ता व्यावसायिक कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी घेतला आहे. लवकरच याबाबतची टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकांना दंड करणार...

महापालिका इमारत व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी अथवा कार्यालयात थुंकल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय अस्वच्छ परिसर करणार्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

Post a Comment

0 Comments