google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार... एका मुलीला तर चक्क 'तू माझ्या बायको सारखी दिसतेस',शिक्षकाकडून सातवीतील विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

Breaking News

धक्कादायक प्रकार... एका मुलीला तर चक्क 'तू माझ्या बायको सारखी दिसतेस',शिक्षकाकडून सातवीतील विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

 धक्कादायक प्रकार... एका मुलीला तर चक्क 'तू माझ्या बायको सारखी दिसतेस',

शिक्षकाकडून सातवीतील विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

सर म्हणाले, तू माझ्या बायकोसारखी दिसते; सातवीतील विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

सांगली जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील शिक्षकाकडून मुलीच्याबरोबर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, एका मुलीला तर चक्क 'तू माझ्या बायको सारखी दिसतेस', असे बोलत विनयभंग देखील केला आहे. 

शिक्षकाचा मुलींच्या सोबत सुरू असणारा घृणास्पद प्रकार समोर आल्यावर संतप्त पालकांनी थेट शाळेवर धाव घेतली आणि त्यानंतर जिल्हा परिषद गाठून शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे शिक्षकावर कडक कारवाई करावी अन्यथा शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील पूर्व भागात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या एका शिक्षकाने शिक्षक पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार केला आहे. शाळेमधील शिक्षकांने मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे. इयत्ता सातवी वर्गातल्या मुलींच्या सोबत या शिक्षकाने अश्लील भाषेत संभाषण केल्याचं समोर आलं आहे.

 मासिक पाळीवेळी गैरहजर राहिलेल्या मुलींना शिक्षकाकडून दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर मारहाण देखील करण्यात येत होती. या शिक्षकाकडून मुलींच्या बाबतीत असभ्यवर्तन सुरू होतं. तसेच शिकणाऱ्या एका मुलीला या शिक्षकाकडून थेट "तू माझ्या बायको सारखी दिसतेस"असं बोलत तिचा विनयभंग देखील केल्याचा प्रकार घडला होता.

शाळेतला या शिक्षकाकडून अश्लील कृत्य सुरूच असल्याने संबंधित काही विद्यार्थिनींनी गावातल्या ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांना याची माहिती दिली. नंतर महिला ग्रामपंचायत सदस्यांनी शाळेमध्ये धाव घेऊन मुख्याध्यापकांना याबाबतची माहिती दिल्यावर मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रकार केला. 

तसेच शाळेमध्ये असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा करत तसे पत्र ग्रामपंचायतला दिले आहे. त्याचबरोबर मुलींच्या बाबतीत असे प्रकार घडू नये म्हणून महिला व किशोरवयीन मुली संरक्षण समिती गठीत करण्यात आल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, गावामध्ये शिक्षकाच्या या अश्लील कृत्याची माहिती समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीची बैठक देखील घेतली. ज्यामध्ये संबंधित शिक्षकाला बोलवून घेण्यात आलं होतं आणि यावेळी या शिक्षकाला जाब देखील विचारला होता. त्यावेळी शिक्षकाने आपली चूक झाली आहे.

 आपल्याला एक वेळ माफ करावी, अशी हात जोडून विनंती केली. मात्र शिक्षकाचा हा प्रकार माफी लायक नसून गंभीर असून भविष्यामध्ये अन्य मुलींच्या बाबतीत असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला.

Post a Comment

0 Comments