सोलापूर राष्ट्रवादी कांग्रेसचा आमदार सेक्सटोर्शनच्या जाळ्यात
पुणे - इंटरनेट च्या आधुनिक युगात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, सेक्सटोर्शन चा प्रकार सध्या राज्यात वाढलेला असून व्हिडीओ कॉल च्या नावावर नग्न व्हिडीओ बनवीत खंडणी उकळण्याचा खेळ सुरू आहे.
मात्र या खेळात अनेक युवकांनी बदनामीच्या भितीपोटी स्वतःच आयुष्य संपविले आहे. मात्र राज्यातील एका आमदाराने हिम्मत करीत सेक्स टोर्शन करणारे रॅकेट पकडविण्यात पोलिसांची मदत केली आहे.
सोलापूर मोहोळ येथील राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार यशवंत माने यांना 23 जानेवारीला अनोळखी क्रमांकावरून मॅसेज आला, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर अनेकदा माने यांना त्याच नंबरवरून मॅसेज येऊ लागले त्यावेळी सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले, मात्र 31 जानेवारीला त्यांना त्या नंबरवरून व्हिडीओ कॉल आला, आमदार माने यांनी कॉल स्वीकारला असता समोरून एक मुलगी नग्नावस्थेत होती, त्यांनी लगेच तो कॉल कट केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना व्हिडीओ मार्फ करीत पैसे द्या अन्यथा तुमचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करू अशी धमकी आमदार माने यांना पुढच्या व्यक्तीने दिली.
व्हिडीओ डिलीट करायचा असतील तर 1 लाख रुपयांची मागणी केली मात्र आमदार माने यांनी याबाबत पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रारीची दखल घेत थेट आरोपीच्या शोधात राजस्थान गाठले, तो क्रमांक भरतपूर येथील असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी आरोपी रिझवान अस्लम खान याला ताब्यात घेतले, आरोपिकडून 4 मोबाईल, 4 सिम कार्ड व मोबाईल मध्ये तब्बल 90 अश्लील मोबाईल क्लिप्स जप्त केल्या.
आरोपीला अटक केल्यावर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने आरोपी खान ला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे


0 Comments