google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 झोपेत असलेल्या बापाच्या डोक्यात खोरे घालून मुलाने केला खून!

Breaking News

झोपेत असलेल्या बापाच्या डोक्यात खोरे घालून मुलाने केला खून!

 झोपेत असलेल्या बापाच्या डोक्यात खोरे घालून मुलाने केला खून!


माजलगाव :- झोपेत असलेल्या बापावर खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यावर घाव घालून मुलाने त्यांचा खून केल्याची घटना गुरुवार (ता. २) तालुक्यातील टाकरवन येथे पहाटे ४ वा. दरम्यान घडली. 

या घटनेनंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी तत्काळ त्या मुलास ताब्यात घेतले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मारोती लक्ष्मण भुंबे (वय ५५) रा. टाकरवन ता. माजलगाव असे मृत वडिलाचे नाव आहे.

 तर बाळु उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे (वय ३२)असे आरोपी मुलाचे नाव आहे. वडील मारोती लक्ष्मण भुंबे ह्यांनी त्यांचा मुलगा बाळु उर्फ लक्ष्मण भुंबे मागील आठ दिवसांपासून गायब असल्याची तक्रार माजलगाव ग्रामीण पोलिसात दिली होती. 

त्यानुसार ते व नातेवाईक ही त्याचा शोध घेत होते. मात्र आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण हा गुरुवारी (ता. २) पहाटे ३.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक घरी आला. यावेळी झोपेत असणाऱ्या वडीलावर एकाएकी खोऱ्याच्या तुंब्यानी डोक्यावर प्रहार करू लागला. 

यावर घरात असलेल्या नातेवाईकाने सोडवा सोडव केली, वडील मारोती यांना उपचारार्थदवाखान्यात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा परत येत बाळू उर्फ लक्ष्मण ने खोऱ्याने डोक्यात ब्याने प्रहार केले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकल, पोलीस उपनरीक्षक सचिन दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल वी. बी. खराडे यांनी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदरील खुनाचे कारण समोर आले नसले तरी आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण हा मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments