google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वच्छ भारत अभियान चॊकशी झाली पण पूर्ण लाभार्थ्यांची नाही झाली आहे शौचालय भ्रष्टाचाराची चौकशी करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर अर्धनग्न होहून उपोषण मा.निलेश रहाटे.

Breaking News

स्वच्छ भारत अभियान चॊकशी झाली पण पूर्ण लाभार्थ्यांची नाही झाली आहे शौचालय भ्रष्टाचाराची चौकशी करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर अर्धनग्न होहून उपोषण मा.निलेश रहाटे.

स्वच्छ भारत अभियान चॊकशी झाली पण पूर्ण लाभार्थ्यांची नाही झाली आहे     शौचालय भ्रष्टाचाराची चौकशी करावी अन्यथा 

   जिल्हाधिकारी कार्यालय समोर अर्धनग्न होहून उपोषण मा.निलेश रहाटे.

वाटद खंडाळा :दि०२.०२.२०२३प्रतिनिधी निलेश रहाटे.    स्वच्छ भारत अभियानाची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्यदिन निमित्त केली आणि २ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंती रोजी सुरू केली. या दिवशी मोदींनी राजघाट, नवी दिल्ली, भारत येथे आयोजित जाहीर सभेत भारतातील नागरिकांना संबोधित केले आणि सर्वांना मोहिमेत सामील होण्यास सांगितले

 व ही योजना दारिद्री रेशन कार्ड धारक व गरजू लोकां ना मिळण्यात यावी असे सांगण्यात आले.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सौचालय योजना ही सन २०१४-१९ मध्ये वाटद ग्रामपंचायत नी राबवली होती तर त्या योजने मध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला निर्देशणात आल्यामुळे

 दि:३०जून२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती यांच्या कडे तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे मुख्य प्रचार प्रमुख श्री निलेश रहाटे व ग्रामस्थ यांनी केली होती, योजनेची बिल ही त्या योजने ची नसून निर्मल भारत अंतर्गत बिल बनवली आहेत

 तसेच लाभार्थी चे लोकेशन फोटो नाहीत, सौचालय वर योजने ची पाटी नाही. त्यामुळे त्या योजने मध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येतोय त्यामुळे योजने ची चौकशी करण्यासाठी संबधित अधिकारी टाळाटाळ करता ना दिसत होते.

दि:२२-११-२०२२ला पत्राद्वारे आम्ही दि:२६ जानेवारी २०२३रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण ला बसत आहे असे सांगितल्या नी संबधित यंत्रणा कामाला लागली दर वेळी सामान्य माणसाला जी उत्तर मिळतात तशीच मिळत होती व सांगत होते उपोषण मागे घ्या.

पण ग्रामपंचायत अधिनियम शासन परिपत्रक व्ही पी एम क्र २०१३/प्र.क्र१३७/पंरा ३चे नियम दाखवल्या वर योग्य उत्तर मिळाले.व दि२६-१-२०२३ च्या होणाऱ्या लाक्षणिक उपोषण बाबत संबंधित

 पंचायत समिती रत्नागिरी गटविकास अधिकारी श्री जे पी जाधव साहेब यांनी वरील प्रमाणे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, व तत्कालीन सरपंच व संबधित अधिकारी यांच्या वर कारवाई प्रस्थावीत करण्यात येत आहे असे लेखी लिहून दिल्याने दि २६-१-२०२३ चे लाक्षणिक उपोषण मी व ग्रामस्थ यांनी मागे घेतले.

पण त्यामध्ये २/३सौचालय एकाच कुटूंबात ज्याच्या नावावर आहेत लाभार्थी म्हणून त्याच्या कडून वसुली करण्यात यावी असे सांगितले पण नियमानुसार ज्यानी भ्रष्टाचार केला आहे ते पैसे त्याच्या कडूनच वसुल करावे ते ही व्याजा सहित असे आहेत

 मग त्याची शिक्ष्या लाभार्थी ना का? लाभ दिल्यावर ९/१० वर्षीनी योजने चे पैसे रिटन घेता येतात का?नियमानुसार योजनेचा लाभ देणारे हयांनी सौचालय फोटो, बिल,सौचालय पाटी हेच पुरावे जतन करून ठेवले ले नाहीत

 मग सौचालय बांधले कस्यावरून २७१लाभार्थी चे १२ हजार प्रमाणे ३२ लाख ५५ हजार होतात तर झालेला भ्रष्टाचार हा त्याच रक्कमेचा होत आहे हे स्पष्ट दिसते आहे तरी हयाची सखोल चौकशी करून ही किती चा गैरव्यवहार झालेला आहे ते सुद्धा अहवाल पंचायत समिती तक्रारदार ला देत नाहीत.

 बाकी चे लाभार्थी हे खरोखर गरजू होते का त्याची ही चौकशी होत नाही हे न उलगडणारे कोडे आहे.तरी लवकरात लवकर संबधित अधिकाऱ्यानवर ग्रामपंचायत अधिनियम परिपत्रका प्रमाणे संबधित अधिकाऱ्यांनवर फौजदारी कारवाई करण्यात यावी

 व जेवडी गैरव्यवहार झालेली रक्कम ही घोषित करून संबधित आधीकारी न कडून वसुल करून शासन दरबारी जमा करावी व तसे न झाल्यास परत जिल्हाधिकारी कार्यालय समोर अर्धनग्न होहून उपोषण साठी बसू अशी ताकीत पंचायत समिती रत्नागिरी ला देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments