google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! पंढरपुरात सुमारे १५० भाविकांना अन्नातून विषबाधा

Breaking News

ब्रेकिंग! पंढरपुरात सुमारे १५० भाविकांना अन्नातून विषबाधा

 ब्रेकिंग! पंढरपुरात सुमारे १५० भाविकांना अन्नातून विषबाधा

पंढरपुरात माघी वारी यात्रेसाठी जमलेल्या भाविकांपैकी सुमारे १५० जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. प्रकृती बिघडलेल्या सर्व भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठात काल रात्री भाविकांनी भगर आमटी खाल्ली. मध्यरात्रीच्या सुमारास अनेकांना त्रास होऊ लागला. मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला.

 याची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणेने तातडीने हालचाल करून सर्वांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले. उपचारानंतर सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Post a Comment

0 Comments