google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिक्षकाने केले गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘आय लव्ह यू’ पाठवत होता असा मेसेज

Breaking News

शिक्षकाने केले गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘आय लव्ह यू’ पाठवत होता असा मेसेज

 शिक्षकाने केले गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य


व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘आय लव्ह यू’ पाठवत होता असा मेसेज

पुण्यातल्या कोंढवा येथील एका शाळेत एका शारीरिक शिक्षणाच्या (पीटी) शिक्षकाने गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनाच्या दरम्यान चार विद्यार्थीनींनी हा प्रकार सांगितल्या नंतर ही धक्कादायक बाब उघड झाली. हा शिक्षक विद्यार्थीनींना मिठ्या मारत असे. तसेच तो त्याचे चुंबन घेऊन त्यांचा विनयभंग करत होता.

 इतक्यावर न थांबता हा शिक्षक विद्यार्थिनींना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘आय लव्ह यू’ असा मेसेजही पाठवत होता. हा धक्कादायक प्रकार शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शाळेच्या वतीनेच या शिक्षकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अविनाश गोविंद चिलवेरी ( वय २३, रा.बिडी कामगार वसाहत, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्यावतीने एका ३७ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर याप्रकरणी चिलेवार याच्या विरुध्द पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यामध्ये एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आरोपी तेथे सात ते आठ महिन्यांपूर्वीच पी.टी. शिक्षक म्हणून रुजू झाला होता. तो मागील दोन महिण्यांपासून तेथील विद्यार्थीनींना जबरदस्ती मिठी मारुन चुंबन घेत असे. तसेच त्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आय लव्ह यू असा मेसेजही पाठवत होता. हा प्रकार नोव्हेंबर पासून सुरू होता.

Post a Comment

0 Comments