google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्देवी घटना... भाजपा कार्यकर्त्याने पत्नीसह संपवली जीवनयात्रा; धक्कादायक कारण समोर, परिसरात खळबळ

Breaking News

दुर्देवी घटना... भाजपा कार्यकर्त्याने पत्नीसह संपवली जीवनयात्रा; धक्कादायक कारण समोर, परिसरात खळबळ

दुर्देवी घटना... भाजपा कार्यकर्त्याने पत्नीसह संपवली जीवनयात्रा;

धक्कादायक कारण समोर, परिसरात खळबळ 

नाशिक जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील डीके कॉर्नर भागात एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

 मंगळवारी (१० जानेवारी) रात्री हा प्रकार घडला. पंकज दिगंबर बिरारी (वय ४०) व रेणुका पंकज बिरारी (वय ३५) असे दाम्पत्याचे नाव आहे.घटना घडली त्यावेळी घरात कोणी नसल्याने उशिरा हा प्रकार लक्षात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज भाजपाचा धडाडीचा कार्यकर्ता होता. 

या दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कर्जबाजारीपणाला तसेच खासगी कंपनीने लावलेल्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.पंकज ने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे बोलले जाते. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत घटनेची माहिती घेण्यास सुरूवात केली.

 आहे.प्रमोद आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या या प्रकरणी गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी सांगितले. अचानक प्रमोद याने पत्नीसह आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments