घरात कुणी नसल्याचा फायदा घेत काका आणि भावानेच केला लैंगिक अत्याचार
अकोला जिल्यातील बाळापूर तालुक्यातील शेळाद येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन नात्यातील काका, मावसभाऊ व अन्य एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा पोलिस तपास करत आहेत.
नात्याला काळीमा फासणारी घटना :- बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन काका व मावसभाऊ व अन्य एक अशा तिघांनी नात्याला काळिमा फासली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यामध्ये तिघांना अटक केली आहे.
मुलीवर अत्याचार : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच असल्याचे पाहुन तिचा काका, मावसभाऊ तसेच गावातील ज्ञानेश्वर उर्फ लाल्या बंडु शेळके यांनी त्या मुलीशी शारिरीक संबंध प्रस्तापीत करुन अत्याचार केला. अल्पवयीन मुलीचा घरात कुणीही नसल्याचे पाहुन वेगवेगळ्या बहाण्याने तिघांनी वेगवेगळ्या वेळी प्रवेश करुन अल्पवयीन मूलीवर अत्याचार केले.
या प्रकरणी पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादिनुसार बाळापूर पोलीसांनी भादवी कलम ३७६, ३७६ अ (ए), ३७८ (3), ३५४, ३५४ (ए), ५०६, ३४ तसेच अनुसुचित जाती जमाती अधिनियमन सहकलम ३, ४, ५, ६, ७, ८ पोटकलम ३ (२) अन्वये तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली. या बाबत गर्भवती युवती ची वैघकीय तपासणी करण्यात आली.
या बाबत आणखी काही आरोपी ची संख्या वाढण्याची शक्यता पोलिस सुत्राकडून समजते. याबाबत युवती व आरोपी च्या डि.एन,ए. तपासणी नंतरच खरा आरोपी समोर येईल. गुन्हा चा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुलराज करीत आहे.


0 Comments