google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहीद जवान संस्थेच्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

Breaking News

शहीद जवान संस्थेच्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

 शहीद जवान संस्थेच्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

   सांगोला शहीद जवान संस्थेच्या वतीने नेहरू चौक सांगोला येथे नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सुरुवातीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस 

युवा व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल भैया कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते नागनाथ घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 यावेळी बोलताना प्रफुल्ल भैया कदम म्हणाले की भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे जय हिंद ची घोषणा देत जगाचे लक्ष वेधून घेणारे बंगालचे थोर सुपुत्र म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस होय

 ओरिसा प्रांतातील कटक या शहरात 23 जानेवारी 897 रोजी सुभाष बापूंचा जन्म झाला कलकत्त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्लंडला गेले व आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर आयसीएस परीक्षा उत्तीर्ण झाले व भारतात परतले व त्यांनी भारत मातेची सेवा करण्याचे व्रत घेतले आपले मनोगत व्यक्त केले.

 यावेळी नागनाथ घोरपडे यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या  जीवनातील प्रसंग सांगितले.. या कार्यक्रमास मेजर रविंद्र मराळ, भारत वसेकर अजित जाधव देवा मासाळ, सचिन ढोले सर शैलेश कसबे सुरज चांदणे इत्यादी मान्यवर व शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments