google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 २६ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी_कार्यालय समोर उपोषण ....रत्नागिरी वाटद खंडाळा

Breaking News

२६ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी_कार्यालय समोर उपोषण ....रत्नागिरी वाटद खंडाळा

 २६ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी_कार्यालय समोर उपोषण ....

रत्नागिरी वाटद खंडाळा

 दि:१४-१-२३  सन २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी सुद्धा आपल्या हक्का साठी व न्याय मिळवण्यासाठी आज ही उपोषण करून सरकार कडे दाद मागावी लागत आहे.

 ग्रामपंचायत कार्यालयात होत असलेले भ्रष्टाचाराला व मनमानी कारभार ला आळा घालण्यासाठी तक्रारी देऊनही तक्रारीची अद्याप दखल घेत नसल्याने नाईलाजास्तव लाक्षनिक उपोषणाचा मार्ग निवडा वा लागत आहे. 

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती रत्नागिरी येथे दि.३०-०६-२०२२  रोजी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजना सौचालय अनुदान बाबत तक्रारदार निलेश वि रहाटे व ग्रामस्थ वाटद यांनी केली होती.

पण पंचायत समिती मधील अधिकारी हया घोटाळा बाबत चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहेत.त्यामुळे नाईलाजास्तव दि:२६जानेवारी२०२३ रोजी मि व ग्रामस्थ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण ला बसत आहोत. जर ग्रामस्थ व गावाला योग्य न्याय मिळत नसेल तर आमरण उपोषण सारखा पर्याय ग्रामस्थ यांना निवडावा लागेल.

तक्रारीतील मागण्या. सन२०१४ ते २०१९ मधील स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सौचालय अनुदान गैरव्यवहार बाबत संबधित अधिकारी ची विभागीय चौकशी करून त्याच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments