google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला अनकढाळ टोल प्लाझा येथें ३४ वे रस्ता सुरक्षा अभियान व मोफत आरोग्य-नेत्र तपासणी, मोफत औषधोपचार शिबीर संपन्न

Breaking News

सांगोला अनकढाळ टोल प्लाझा येथें ३४ वे रस्ता सुरक्षा अभियान व मोफत आरोग्य-नेत्र तपासणी, मोफत औषधोपचार शिबीर संपन्न

सांगोला अनकढाळ टोल प्लाझा येथें ३४ वे रस्ता सुरक्षा अभियान व

मोफत आरोग्य-नेत्र तपासणी, मोफत औषधोपचार शिबीर संपन्न

सांगोला- बोरगाव वाटंबरे हायवेज प्रा.लिमिटेड , वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ,सांगोला आणि महामार्ग पोलीस विभाग अनकढाळ टोल प्लाझा सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र व राज्य शासन यांच्या अंतर्गत नवीन वर्षाच्या प्रारंभी राबवण्यात येणारे  ३४ वे रस्ता सुरक्षा अभियान आणि मोफत आरोग्य तपासणी- नेत्र तपासणी

 मोफत औषधोपचार शिबीर आयोजित केले होते.सदरच्या शिबीराला अत्यंत उदंड प्रतिसाद लाभला रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक श्री.सज्जन वाघमोडे यांनी वाहतुकीचे नियम व चिन्हे यांचे अनुपालन करणे,

दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे,चारचाकी चालवताना सीट बेल्ट चा वापर करणे,मद्यप्राशन करून वाहन न चालवणे,वाहन चालवताना मोबाईल चा वापर न करणे तसेच इतर अनेक नियमांबद्दल प्रबोधन केले.वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.अण्णासो लवटे ,

स्त्रीरोग व सर्जेरी विभागाचे डॉ.परेश खंडागळे, मेडिसिन विभागाचे डॉ.निरंजन केदार,नेत्ररोग तंत्रज्ञ श्री.जुंदळे, हॉस्पिटल  नर्सिंग स्टाफ व मॅनेजमेंट यांनी ८४ रुग्णांची व प्रवाशांची मोफत आरोग्य नेत्र तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार दिले.

या शिबिरामध्ये इ.सी.जी. काढणे, रक्तदाब चेक करणे,ब्लड शुगर चेक करणे,रक्तातील ऑक्सिजन चेक करणे,डोळ्यांचा नंबर काढून योग्य  सल्ला व मार्गदर्शन देण्याची सुविधा पुरवली गेली.अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडलेल्या सदरच्या शिबिराला महामार्ग पोलीस उपनिरीक्षक श्री.सज्जन वाघमोडे,

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डायरेक्टर्स चे डॉ.अण्णासो लवटे, डॉ.परेश खंडागळे, डॉ.निरंजन केदार ,वेदांत हॉस्पिटल नर्सिंग स्टाफ ,बोरगाव-वाटंबरे हायवेज प्रायव्हेट लिमिटेड व मंगळवेढा -सोलापूर हायवेज प्रा. लिमिटेडचे सेफटी मॅनेजर श्री.इंग्लेश शर्मा,इनसिडेंट मॅनेजर श्री तेजविर सिंग,सिनिअर एकझेकुटीव्ही मॅनेजर श्री परवेंदर चौहान,

अनकढाळ टोल प्लाझा मॅनेजर श्री.अंशुल शर्मा ,टोल प्लाझा मॅनेजर श्री. नितिन शितोळे,सर्व महामार्ग पोलीस स्टाफ,सर्व अनकढाल टोल प्लाझा अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.रस्ता सुरक्षा अभियान ,मोफत आरोग्य-नेत्र तपासणी ,मोफत औषधोपचार शिबीर उत्साहात पार पडले.*

Post a Comment

0 Comments