google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महिला शिक्षकाचा सहकारी शिक्षकांकडून विनयभंग : जत तालुक्यातील घटना

Breaking News

महिला शिक्षकाचा सहकारी शिक्षकांकडून विनयभंग : जत तालुक्यातील घटना

 महिला शिक्षकाचा सहकारी शिक्षकांकडून विनयभंग : जत तालुक्यातील घटना 

जत : मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून जत तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत महिला शिक्षिकेचा दोन शिक्षकांनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना (गुरुवार) सकाळी घडली. या प्रकरणी जत पोलिसात शिक्षक बाळू तुकाराम साळुंखे व अर्जुन महादेव माळी या दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षिकेकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार होता.

 परंतु २४ जानेवारी गटशिक्षणाधिकारी यांनी सदरचा चार्ज शिक्षक बाळू तुकाराम साळुंखे यांच्याकडे द्यावा असे लेखी पत्राद्वारे कळविले होते. दरम्यान याच कारणावरून बाळू साळुंखे व अर्जुन माळी यांनी २६ जानेवारी रोजी संबंधित महिला शिक्षिकेकडे याबाबत विचारणा केली.

बाळु सांळुखे यांनी संबंधित महिला शिक्षकाच्या जवळ जात मला तुम्ही मुख्याध्यापकचा चार्ज का देत नाही, मला मुख्याध्यापकाचा चार्ज देण्याबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांचेकडून पत्र दिले आहे. तरी सुद्धा तुम्ही मला सदर शाळेच्या मुख्याध्यापकाचा चार्ज देत नाही, 

असे म्हणत विनयभंग केल्या ची घटना घडली. तसेच शिक्षक अर्जुन माळी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधित महिला शिक्षिकेने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments