सोलापूर ब्रेकिंग! तीन वर्षाच्या बालकाला ट्रकने चिरडले
सोलापूर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. सोलापुरातील जड वाहतकीमुळे आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.
दोनच दिवसाखाली जुना पुना नाका येथे डंपर खाली येऊन एका चिमुकल्याचा जीव होता. त्यातच आज पुन्हा जड वाहतुकीने एका चिमुकल्याचा बळी घेतला. शांती चौकाच्या चौकाच्या काही अंतरावर असलेल्या ताना बाना चौकात ही दुर्घटना घडली.
ट्रकने चिरडल्याने एका तीन वर्षीय बालकाचा हकनाक जीव गेला. असद अल्ताफ बागवान असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो मूळचा अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथील रहिवासी होता. असद आपल्या आजी-आजोबांसोबत सोलापूर शहरात येत असताना ही घटना घडली.
त्याला ट्रक क्रमांक 13 सी यु 0194 ने जोरदार धडक दिली. असदचा जीव गेल्याने नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सोलापूर शहरात बेकायदेशीररित्या होत असलेल्या जड वाहतुकीला आळा कधी बसणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.


0 Comments