...तर भाजपसोबतही युती करायला तयार
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती होऊन आठवडाही उलटत नाहीत तोवर प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबतही युती करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी भाजपला एक अट घातली आहे.
ती अट मान्य केल्यास भाजपसोबत राजकीय समझोता करायला तयार आहे, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले. त्यांनी आज लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचा दुष्मन नाही. भारतीयांमध्ये दुष्मनी असू शकत नाही. एकमेकांसोबत टोकाचे मतभेद असू शकतात.
भाजप-आरएसएससोबत आमचे मतभेद आहेत. हे मतभेद कशावरून आहेत ते मांडलेले आहे. आरएसएस आजही मनस्मृती मानते. आमचा लढा मनस्मृती विरोधात आहे. मनस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत भाजप कार्य करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत, असे आंबेडकर म्हणाले.


0 Comments