google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुण्यातील कार्यक्रमात राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग !

Breaking News

पुण्यातील कार्यक्रमात राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग !

पुण्यातील कार्यक्रमात राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग !


 राष्टवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या साडीने एका कार्यक्रमात अचानक पेट घेतल्याची घटना घडली असून सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही.

राष्ट्रवादीच्या लोकप्रिय असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या आज एका कार्यक्रमासाठी पुण्यात दाखल झाल्या होत्या. या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करीत असताना अचानक त्यांच्या साडीने पेट घेतला. 

हिंजवडी येथे कराटे क्लासेसच्या प्रशिक्षण केंदाच्या क्लासचे उद्घाटन होत होते. या कार्यक्रमासाठी खा. सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात येत होते. यावेळी त्यांच्या साडीनेच अचानक पेट घेतला त्यामुळे प्रचंड गोंधळ आणि चिंताही निर्माण झाली. 

यावेळी उपस्थित असलेल्या एकाने साडीने पेट घेतला असल्याची गंभीर बाब लक्षात आणून दिली आणि त्यामुळे लगेच साडीला लागलेली आग विझविण्यात आली. आग तत्काळ विझाविल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

खा. सुप्रिया सुळे यांच्या अंगावरच्या साडीला आग लागली असली तरी ती वेळीच विझवली गेली त्यामुळे खा. सुळे यांना कसलीही इजा झाली नाही परंतु कार्यकर्त्यांतून मात्र संताप आणि चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा कार्यक्रम आटोपून खा. सुप्रिया सुळे जळलेल्या साडीसह पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या परंतु जाण्यापूर्वी इतरांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 या घटनेने कार्यक्रमस्थळी अनेकांना धक्का बसला असून याची माहिती बाहेर गेल्यावर राज्यभर चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.  सुदैवाने खा. सुळे यांना काहीही इजा झाली नाही त्यामुळे कार्यकर्ते सुखावले असले तरी ही घटना घडली असल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments