सोलापूर यांनी राजकारणात नातवाला केलं लाँच? कोण आहे सुशीलकुमार शिंदेंचा नातू?
सोलापूर: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मोठी कन्या स्मृती शिंदे यांचा चिरंजीव शिखर पहरिया हा काल सोलापूरमधील प्रसिद्ध सिद्धेश्वर महायात्रेत आवर्जून उपस्थित होता.त्यामुळेच आता सुशीलकुमार यांचा राजकीय वारसदार शिखर असल्याची जोरदार चर्चा सध्या सोलापूरमध्ये रंगली आहे.
शिखर पहरिया याला सुशीलकुमार शिंदेंनी थेट सिद्धेश्वर यात्रेत आणून राजकीयदृष्ट्या लाँच करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. याचनिमित्ताने सुशीलकुमार यांनी आपल्या विरोधकांना मेसेज देण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता आपल्या राजकीय शिखर पहारिया हाच आहे असा संदेश तर शिंदे देऊ पाहत नाहीत ना अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.
सोलापुरात ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रेचा महत्वपूर्ण विधी अक्षता सोहळा संमती कट्ट्यावर पार पडला. या अक्षता सोहळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्वला शिंदे आणि नातू शिखर पहारिया यांच्यासह उपस्थित होते. सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी खुर्ची रिकामा ठेवायला सांगितली
सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर हे सोलापूरमधील कोणत्याही सार्वजनिक उत्सवात कधी सहभागी होत नव्हते. पण 14 जानेवारी रोजी सिद्धेश्वर महायात्रेत सुशीलकुमार शिंदेंसह त्यांचे नातू शिखर देखील उपस्थित होते. 'मी आता दरवर्षी सिद्धेश्वर महायात्रेला हजर राहणार.' असंही यावेळी शिखर यांनी सांगितले.
सुशीलकुमार शिंदे यांना तीन मुलीच आहेत. प्रणिती शिंदे या सोलापूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्या सोलापूर शहर मध्यमधून आमदार आहेत. शिंदे यांना मुलगा नसल्याने त्यांचा वारस प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, सुशीलकुमार शिंदेनी शिखर पहारिया यांना सिद्धेश्वर महायात्रेत आणल्याने आता पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय वारसाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शिखरच्या राजकीय एन्ट्रीवर सुशीलकुमार शिंदेंना विचारलं असता ते म्हणाले की, 'ही नवी पिढी स्वतःचा निर्णय स्वतः घेईल.' असं म्हणत सुशीलकुमार शिंदेंनी अप्रत्यक्षरित्या नातवाच्या राजकारणातील नव्या इनिंगची घोषणाच केली आहे.
सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; जावयाला संभाळण्यासाठी मी गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिलं शिखर हे मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योजक संजय पहारिया यांचे चिरंजीव आहेत. मध्यंतरी शिखरच नाव बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्याशी जोडलं गेलं होतं.
मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला होता. अशावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवणार नसल्याचं बोललं जात आहे. अशावेळी या मतदारसंघातून नेमकं कोणाला तिकिट देणार अशी चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या नातवाची राजकारणातील अप्रत्यक्ष एंट्री ही लोकसभा निवडणुकीसाठी तर नाही ना? अशी जोरदार चर्चा सोलापुरात सुरू आहे.


0 Comments