शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न.
सांगोला (प्रतिनिधी)सांगोला येथील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.
सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पूजन मा. अध्यक्ष अनिल तारळकर यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थापक निळकंठ शिंदे सर यांनी मकर संक्रातीचे महत्त्व सांगताना हे देशातील सर्वात मोठे आणि महत्वाचे आध्यात्मिक पर्व मानले जाते. या काळात दान महत्वाचे मानले जाते. तिळाचे तर्पण केले जाते.
तीळ ,माती आणि गंगाजलाला ब्रम्हांडाशी जोडलेल्या पिंडीच्या स्वरूपात मानले जाते या काळात ब्रम्हांड स्वतः पिंडीचे रूप धारण करते ,त्यामुळे दानाचे विशेष महत्त्व मानले जाते. मकर संक्रातीत सूर्याची गती बदलल्यामुळे ऊर्जाही वाढते असे शिंदे सरांनी सांगून मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मकरसंक्रांतीनिमित्त अशोक कामटे संघटनेचे एडवोकेट हर्षवर्धन चव्हाण, सदस्य व पदाधिकारी यांनी दिवसभरात सर्वांना तिळगुळ वाटप करून मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी आभार चारुदत्त खडतरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहीद अशोक कामटे संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले


0 Comments