google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर- नुकतेच लग्न ठरलेल्या अजयने घेतला शेवटचा निरोप

Breaking News

सोलापूर- नुकतेच लग्न ठरलेल्या अजयने घेतला शेवटचा निरोप

सोलापूर- नुकतेच लग्न ठरलेल्या अजयने घेतला शेवटचा निरोप

सोलापूर : वडिल विमा रुग्णालयातून सेवानिवृत्त झाले होते. वय झाल्याने आई थकली होती. मुलीचा विवाह झाला, ती सासरी सुखी आहे. मुलगा अजयचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले होते. अजयचा ९ मे रोजी विवाह होणार असल्याने वयस्क आई-वडिल आनंदी होते.

आई-वडिल वयस्क झाल्याने अजय हा बंगळुरुचा जॉब सोडून सोलापुरात आला होता. अजय आता कमावता झाला होता. अजयच्या बहिणीला दोन मुले, तिही आता मोठी झाली होती. अजयचा विवाह तीन महिन्यांनी होणार असल्याने ते सर्वजण खूश होते. 

विशेष म्हणजे अजयने पुण्याला जावून २२ जानेवारीला बहिणीला माहेरी आणले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजय दोन दिवसांत परत येतो म्हणून तिरूपतीला मित्रासोंबत गेला होता. दर्शन झाल्यानंतर त्याने निघालो असल्याचे कॉल करून घरी कळवले.

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनमधून बीई झालेल्या अजयला शेअर मार्केटची प्रचंड आवड होती. उच्च शिक्षण घेऊन सोलापुरातून पुण्याला जाणाऱ्या तरूणांना सोलापुरातच जॉबची मोठी संधी असल्याचे तो आवर्जुन सांगायचा. 

जुळे सोलापूर परिसरात तो सर्वांचाच लाडका झाला होता. मित्रांनी त्याला तिरूपतीला यायला आग्रह केला आणि मागच्या वर्षी तो तिरूपती दर्शनाला गेला नसल्याने त्याने होकार दिला.

Post a Comment

0 Comments