कोल्हापूर-मुलाच्या हव्यासापोटी पतीकडून पत्नीची हत्या....l
कोल्हापूर (प्रतिनिधी)राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव सरकार असे अभियान राबवत राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.कोल्हापुरात मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण - कोल्हापुरात मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून करण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील दोनवडे येथील या घटनेने खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीची हत्या करुन विजेचा शॉक लागल्याचा बनाव केला होता.
दोन मुली झाल्याने पत्नीचा पतीकडून छळ सुरू होता. अखेर पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. आश्विनी एकनाथ पाटील यांचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर पती एकनाथ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केला. अश्विनी एकनाथ पाटील (वय 28) असे या विवाहितेचे नाव आहे.
आज पहाटे हा प्रकार घडला आहे. अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती एकनाथ याने अश्विनीचा खून केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी पती एकनाथ याला ताब्यात घेतले आहे.


0 Comments