google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उसाच्या मोळ्या अंगावर पडल्याने बालिकेचा मृत्यू

Breaking News

उसाच्या मोळ्या अंगावर पडल्याने बालिकेचा मृत्यू

 उसाच्या मोळ्या अंगावर पडल्याने बालिकेचा मृत्यू

सिद्धेश्वर कुरोली ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवून ऊसाच्या मोळ्या अंगावर पडून १२ वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. सजनी अमर काळे (वय १२) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवार दि. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गायत्री लकी शिंदे, झिंगाट साजन शिंदे व १७ रोजी सजनी अमर काळे हे भाकरी घेऊन तिघे रस्त्याने जात होते. यावेळी धकटवाडी हद्दीमध्ये आले असतानाच ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. एम. एच. १० ए वाय ८४७९) भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत आल्याने तिघांनी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. 

मात्र ट्रॉलीमधील ऊस मोळी अंगावर पडल्याने सजनी अमर काळे ही ऊसाखाली अडकून पडली. तेथील ये-जा करणाऱ्या लोकांनी ऊसाच्या मोळ्या काढून काळे हिला वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेची वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून ट्रक्टर चालक चौडाप्पा प्रभू पुजारी (वय ३९, कर्नाटक राज्यातील इंडी ता. विजापूर) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तपास हेड कॉ. शांतीलाल ओंबासे करत आहेत.

Post a Comment

0 Comments