google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा. उषा कोळवले / मेखले यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर

Breaking News

प्रा. उषा कोळवले / मेखले यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर

 प्रा. उषा कोळवले / मेखले यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर    

सांगोला :-       सांगोला तालुक्यातील चोपडी येथील  व माणदेश महाविद्यालय जूनोनीच्या प्राध्यापिका उषा कोळवले / मेखले यांना साप्ताहिक स्नेहसंयोग यांच्याकडून  दिला जाणारा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणरत्न पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला आहे . साप्ताहिक स्नेहसंयोग यांच्याकडून पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले आहे  . 

 त्यांना हा   पुरस्कार जाहीर झाल्याने चोपडी गावच्या शिरपेचात आजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे . हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. उषा कोळवले / मेखले यांच्यावर त्यांच्या गावच्या पंचक्रोशीतून  व महाविद्यालयाकडून त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे .   

राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणरत्न पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह , मानपत्र , शाल , फेटा , श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . प्रा. उषा कोळवले / मेखले या शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या योग्य व अचूक मार्गदर्शनामुळे अनेक मुलांचे चांगले भविष्य घडले  आहे .

 तसेच त्या आपल्या विद्यार्थ्यांवरती योग्य संस्कार करत आहेत तसेच त्या सामजिक कार्य करत आहेत .  प्रा. उषा कोळवले / मेखले या नेहमीच  शैक्षणिक व सामाजिक  क्षेत्रात आपले अतुलनीय सहकार्य करून सेवा करत आहेत  . 

या  कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार साप्ताहिक स्नेहसंयोग कडून जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार म्हणजेच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची पोहोच पावती आहे . त्यांना या अगोदर ही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.  

प्रा. उषा कोळवले / मेखले यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात  निष्ठापूर्वक कार्य केले आहे व करत आहेत या कार्याची साप्ताहिक स्नेहसंयोगने दखल घेतली असून त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे . 

पुरस्कार वितरण सोहळा हा  दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी स्नेहसंयोग साप्ताहिकाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून  प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडणार आहे . अशी माहिती साप्ताहिक स्नेहसंयोग  यांच्याकडून देण्यात आली  आहे .

Post a Comment

0 Comments