वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला
येथे दिनांक ८ जानेवारी ते १० जानेवारी रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
सांगोला येथे वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे रविवार दिनांक ८ जानेवारी, सोमवार दिनांक ९ जानेवारी,मंगळवार दिनांक १० जानेवारी रोजी सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती वेदांत हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ.आण्णासो लवटे व डॉ.निरंजन केदार यांनी दिली आहे.सदरचे शिबीर वेदांत हॉस्पिटल , एस. टी.स्टॅन्ड समोर भोपळे रोड सांगोला येथे होणार आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदरच्या शिबिराची वेळ राहणार आहे.या शिबिरासाठी वेदांत हॉस्पिटल सांगोलाचे अस्थीरोग विभाग
डॉ.अक्षय मरगळे सुपर स्पेशालिस्ट अस्थीरोग तज्ञ यांच्या मार्फ़त अस्थीरोग,सर्व प्रकारचे फ्रॅक्चर केसेस,गुडघेदुखी,सांधेदुखी,संधिवात,आमवात ,गाउट, सर्व अक्सीडेंट केसेस यावर निदान व मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिये संदर्भातील सल्ला देण्यात येणार आहे दुर्बिणीद्वारे होणारी शस्त्रक्रिया, तुटलेल्या लिगामेंट ची शस्त्रक्रिया,
सांधा बदलीची शस्त्रक्रिया, मणक्यावर होणारी शस्त्रक्रिया या संदर्भात योग्य मार्गदर्शन देण्यात येणार आहे आणि मुत्ररोग विभागाचे डॉ.चेतन शहा सुपर स्पेशालिस्ट मूत्रविकार तज्ञ
यांच्या मार्फत मूत्रविकार,मूतखडा निदान,प्रोस्टेट-ग्रंथीची सूज, किडनीचे आजार, मूत्राशयाचे आजार, युरो सर्जरी या संदर्भात निदान व उपचार तसेच शस्त्रक्रियेसंदर्भातील सल्ला देण्यात येणार आहे आणि सर्जरी,मूळव्याध,भगंदर ,फिशर विभाग चे डॉ.अमर शेंडेएम.एस.सर्जरी Anorectal Specialist यांच्या मार्फत शौचास साफ न होणे , बद्धकोष्ठता,शौचातुन रक्त पडणे, शौचास वेदना होणे ,शौचाच्या ठिकाणी पु येणे, सूज असणे ,खाज सुटणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर मोफत तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत तसेच
दुर्बिणीद्वारे मूळव्याध, भगंदर इतर अवघड जागेचे दुखणे ,फिशर पाहण्याची सोय करण्यात आली आहे. अपेंडीक्स ,अल्सर,हायड्रॉसील,अंगावरच्या गाठी ,कॅन्सर रोग निदान व सल्ला या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे.बालरोग विभागामार्फत कमी दिवसाचे बाळ,कमी वजनाचे बाळ, कावीळ वाढली असल्यास,
बाळाला सतत झटके येत असल्यास,निमोनिया, लहान बाळाच्या ऑपरेशन ची सोय जन्मानंतर बाळ रडत नसल्यास ह्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.स्त्री रोग व प्रसूती विभाग यांच्या मार्फत बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे, सिझेरियन,गर्भ पिशवी काढणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी साफ करणे यावर मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे.
मेडिसिन विभाग यांच्या मार्फत दमा, मधुमेह, विषबाधा, उच्चरक्तदाब, किडनीचे विकार,सर्पदंश, अर्धांगवायू,निमोनिया, छातीचे विकार ,पोटाचे विकार, थायरॉईड यांवर मोफत निदान शिबिराचे आयोजन केले आहे.ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे .
अश्या रुग्णांवरती होणारी शस्त्रक्रिया वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला येथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत करण्यात येतील.हॉस्पिटल मधील अस्थीरोग ,मूत्रविकार, सर्जरी, मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूती
,बालरोग विभागाच्या तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती महाआरोग्य तपासणी शिबिरासाठी राहणार आहे.सांगली- मिरज -सोलापूर-कोल्हापूर ला होणारी मोठं-मोठी गुंतागुंतीची ऑपरेशन आता आपल्या सांगोल्यामध्ये तज्ञ डॉक्टर्स व सुपरस्पेशालिस्ट सर्जन यांच्या देखरेखी खाली वेदांत हॉस्पिटल मध्ये होत आहेत.
तरी सांगोला-आटपाडी-मंगळवेढा-जत तालुक्यातील गोर-गरीब गरजू रुग्णांनी ,पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व सुजाण नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन हॉस्पिटल चे संचालक डॉ.महावीर आलदार , डॉ.परेश खंडागळे ,डॉ भारत गरंडे यांनी केले आहे.



0 Comments