google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला -उदनवाडी येथे बेलवण नदीपात्रात अवैद्य वाळू उपसा,” शासन गौण खनिज चोरीचे पंचनामे करून कारवाई करणे मागणीसाठी प्रशासनाकडे तक्रार दाखल”..

Breaking News

सांगोला -उदनवाडी येथे बेलवण नदीपात्रात अवैद्य वाळू उपसा,” शासन गौण खनिज चोरीचे पंचनामे करून कारवाई करणे मागणीसाठी प्रशासनाकडे तक्रार दाखल”..

 सांगोला -उदनवाडी येथे बेलवण नदीपात्रात अवैद्य वाळू उपसा,”

शासन गौण खनिज चोरीचे पंचनामे करून कारवाई करणे मागणीसाठी प्रशासनाकडे तक्रार दाखल”..

सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे बेलवण नदी परिसरातून अवैद्य अमाप वाळू उपसा गेल्या अनेक वर्षोनुवर्षे होत आहे.यावर संबंधित दोषी अधिकारी, अन वाळू तस्कर यांचे हफ्ते ठरलेले असून यातून शासनाची गौण खनिज फसवणूक होत आहे.यासंबंधी उदनवाडी येथील नागरिकांनी

जागृत होऊन सामुदायिक नागरिक यांनी गावचे तलाठी ,महसूल विभाग ते तहसीलदार पोलीस स्टेशन इत्यादी सर्वाना तक्रारी,दिलेल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार मौजे उदनवाडी येथील असणारी बेलवण नदी पात्रातील दररोज लहानमोठ् मोटारसायकल,ट्रॅक्टर, डम्पर,जेसीबी,इत्यादी गौण खनिज वाळू तस्करीचे प्रमाण वाढले 

असून वाडी-वस्तीवर, गल्ली बोळात- रात्रंदिवस अवैद्य वाळूचे ढिगारे – हफ्ते वसूल अधिकारी संगनमताने कामकाज जोरात सुरू आहे.सदर दररोजच्या या अवैध वाळू वाहतुकमुळे रहदारी रस्ते खचले असून त्यावर माती-चिखल ढिगारे-खड्डे प्रमाण वाढले आहे.

नदीपात्रातील वाळू उपसा यामुळे पाणीर नदीपात्रात खड्डे तयार झाले असून ,नदीत पाणी असताना , या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे गावातील मागासवर्गीय दोन महिला या वाळू तस्करी खड्ड्यात पडून शहीद झाल्या आहेत.

यातून कोणताही बोध न घेणारे दोषी यांनी, दररोज नलवडे वस्ती,काळामळा,शिंगाडे मळा,लवटे वस्ती,मदने वस्ती,खडी वस्ती,आन आसपासच्या परिसरातील शालेय विद्यार्थी,नागरिकांना जाणे-येणे त्रास होत आहे.

यामुळे गावच्या खनिज संपत्तीचा ऱ्हास होत असून शासकीय दररोज गौण खनिज महसूल बुडत आहे. हा करोडो रुपयांची महसूल चोरी जबाबदार खड्डे,ढिगारे,यांचा रितसर आसपासच्या परिसरात तपासणी-पंचनामे होऊन झालेले नुकसान सत्य समोर येणं आवश्यक आहे. अस तक्रारी अर्जात नमूद आहे.

जवळपास 500 उदनवाडी ग्रामस्थ यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत आजी-माजी सरपंच सदस्य ,पंचायत समिती आजी माजी सदस्य,

विकास सेवा कार्यकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन सदस्य, अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी बांधव इत्यादी लोकांनी निवेदन/तक्रारी दिल्या असून यासाठी अरविंद वलेकर ,पैलवान विजय वलेकर इत्यादी वरिष्ठ मार्गदर्शनाने सदर वाळू उपसा बन्द करण्यासाठी संबंधित विभाग आजपर्यंत तक्रार पाठपुरावा दाखल केलेली आहे.

यानुसार आता सदर न्याय न मिळाल्यास सनदशीर मार्गाने पूर्वसूचना दिल्या नुसार -उदनवाडी अन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उदनवाडी येथे २६ जानेवारी रोजी उग्र आंदोलनचा इशारा त्यांनी दिलेला आहे.यामुळे यावर आता प्रशासन काय करणार याकडे सांगोला तालुक्याचं लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

0 Comments