google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रुदयद्रावक... ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ;इंदापूर तालुक्यातील घटना

Breaking News

रुदयद्रावक... ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ;इंदापूर तालुक्यातील घटना

 रुदयद्रावक.... ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ;इंदापूर तालुक्यातील घटना

इंदापूर तालुक्यातील अंथर्णे परिसरात रुदयद्रावक अशी घटना घडलीय. रस्त्याने निघालेल्या उसाच्या ट्रॅक्टर मधून ऊस काढण्यास गेलेल्या एका सात वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झालाय.सायबु तात्या जाधव असं या मृत बालकाचं नाव आहे.

या घटनेनंतर वालचंदनगर पोलीसांनी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.सायबू जाधव हा रस्त्याने निघालेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर मधून ऊस काढण्यास गेला होता.त्याने ट्राॅली मधील ऊस देखील मोडला.

मात्र याच वेळी त्याचा तोल गेला आणि तो ऊसाच्या ट्राॅलीखाली सापडला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवार दि.१० रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जुन्या शेळगाव रस्त्यावर अंथूर्णे येथील सत्संग भवन समोर ही रुदयद्रावक घटना घडली आहे.

शेळगाव कडून अंथूर्णेच्या दिशेने उसाने भरलेला ट्रॅक्टर (क्र.एम.एच. १६,ए.एम.६५०६) निघाला होता.ट्रॅक्टर अंथूर्णे गावाच्या मध्यवस्तीतून जात असतानाच सायबु तात्या जाधव (वय ७,रा. अंथूर्णे) हा ट्रॅक्टर मधून ऊस काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागे पळत होता.

त्याने ट्रॉली मधील ऊस मोडलाही होता.मात्र ऊस मोडताच त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीखाली पडला.दुर्दैवाने ट्रॉलीचे चाक सायबू याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments