भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जेऊर (ता.करमाळा) भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचे त्रेसष्ठावे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष नारायण (आबा) पाटील, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ, प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष सुराणा, डॉ.शारदा सुराणा, संस्थेचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया,संचालक विलास पाथ्रुडकर,
युवानेते पृथ्वीराज पाटील,संजय दोशी,विवेक दोशी, सुनील बादल, सरपंच भारत साळवे, उपसरपंच अगंद गोडसे, प्रा. हनूमंत धालगडे,श्री. ठोकळ, मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ, दिलीप देवकाते, शेरखान नदाफ, रविंद्र देवकाते,डॉ.रितेश निर्मळ, आबासाहेब गोडसे,उमेश कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य शेरखान नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन संस्था सचिव प्रा.अर्जूनराव सरक यांनी केले. अध्यक्ष व प्रमुख वक्ते यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल शिंगाडे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य केशव दहिभाते यांनी करून दिला.बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन शिक्षक चिटणीस हनूमंत रुपनर यांनी केले.
६३ व्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त पार पडलेल्या अंतर शालेय क्रीडा स्पर्धेच्या विजेत्या संघांना तसेच सन २०२२ मध्ये इयत्ता १०वी व १२वी परीक्षेत विशेष गुण प्राप्त करून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील यांनी आपल्या भाषणातून भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती, सातत्य व विविध शैक्षणिक तसेच क्रीडा उपक्रमाबद्दल कौतुक केले. यावेळी त्यांनी शासनाने असा गुणवान शिक्षण संस्थाना भरीव आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी ते भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे शिस्तबद्ध शैक्षणिक स्नेहसंमेलन पाहून खूपच खुश झाले.
यावेळी डाॅ.सुभाष सुराणा यांनी मुलांना मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच यावेळी लोकनेते मा.श्री. नारायण (आबा)पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक सचिव प्रा. अर्जुन सरक यांनी केले . सूत्रसंचालन अंगद पठाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपक व्यवहारे यांनी मानले.


0 Comments