google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्रप्रमुखांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कारवाई होणेसाठी तीव्र लढा देणार - रविप्रकाश साबळे

Breaking News

केंद्रप्रमुखांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कारवाई होणेसाठी तीव्र लढा देणार - रविप्रकाश साबळे

 केंद्रप्रमुखांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कारवाई होणेसाठी तीव्र लढा देणार - रविप्रकाश साबळे


एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करणार - गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे 


सांगोला /प्रतिनिधी - सांगोला तालुक्यातील शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यावर योग्य ती कारवाई करणे संदर्भात आर टी आय कार्यकर्ते रविप्रकाश साबळे यांनी केलेल्या लक्षणिक उपोषणावर गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या आदेशाने गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी विस्तार अधिकारी यांची चौकशी समिती नेमून एक महिन्यात त्याचा अहवाल देणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने साबळे यांनी उपोषण मागे घेतले.

         सांगोला तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांनी आपल्या अधिकारात असणाऱ्या अनुदानामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते रविप्रकाश साबळे यांनी महिन्यापूर्वी लेखी तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवर गटशिक्षणाधिकारी नाळे यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने गुरुवार दि. 5 जाने. 2023 रोजी लक्षणिक उपोषण केले होते.

 यामध्ये त्यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख तसेच त्यांना पाठीशी घालणारे गटशिक्षणाधिकारी नाळे यांची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होणेसाठी लक्षणिक उपोषण केले. त्यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. आनंद लोकरे यांनी गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांना आदेश देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्यावर गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी यांची चौकशी समिती नेमून एक महिन्यात केंद्रप्रमुखांच्या भ्रष्टचाराची चौकशी अहवाल सादर करण्यात येईल असेल लेखी उत्तर उपोषणकर्ते रविप्रकाश साबळे यांना दिले. त्यानंतर साबळे यांनी उपोषण मागे घेतले.

चौकट - शिक्षण विभागा सारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार होणे हे बाब लोकशाहीला काळिमा येणारी आहे. शिक्षण विभागाला जर का भ्रष्टाचाराने पोखरले तर आपल्या देशाचे भविष्य अंधकारमय   झाल्याशिवाय राहणार. त्यामुळे शिक्षण विभागात होत असणाऱ्या भ्रष्टाचारा विरोधात तीव्र लढा उभारणार - रविप्रकाश साबळे, आरटीआय कार्यकर्ते

Post a Comment

0 Comments