ब्रेकिंग न्यूज.. 52 शिक्षक निलंबित बदली होऊ नये जोडली दिव्यांग असलेले खोटे प्रमाणपत्र
बदली होऊ नये आणि आहे त्याच शाळेत नोकरी राहावी म्हणून बीड जिल्ह्यातील 248 पैकी तब्बल 52 शिक्षकांनी दिव्यांग असलेले खोटे प्रमाणपत्र जोडले होते. चौकशीअंती हा बनाव उघड झाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर त्यांच्यावर दंडात्मक फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.
356 शिक्षकांची मेडिकल पथकाद्वारे तपासणी केली. २०० संशयास्पद होते. त्यातील १४८ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. ५२ शिक्षक दोषी आढळून आले. या ५२ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली.
शासनाकडून त्यांनी वाहन खरेदी केले आहे. याशिवाय आयकरात सुट घेतली आहे. सोमवारपर्यंत काय कारवाई करता येईल, यासाठी विभागीय चौकशी होणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असंही झेडपी सीईओ यांनी सांगितलं.
२०० पैकी साधारणतः ५० जणांना अहवाल यायचा आहे. आणखी २०-२५ जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. वाहन भत्ता घेतला आहे. शिवाय आयकरात सुट घेतली आहे. या सर्व रिकव्हरी करणार असल्याचंही ते म्हणाले. विभागीय चौकशी झाल्याशिवाय कायदपत्राची सत्यता कळणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
0 Comments