google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुंबई हादरली! वरळीत २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ

Breaking News

मुंबई हादरली! वरळीत २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ

 मुंबई हादरली! वरळीत २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ

मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वरळी परिसरात २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने वरळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ वर्ष ८ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मुंबईच्या वरळी परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या जबाबाच्या आधारे वरळी पोलीस आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलामांर्गत गुन्हा आरोपीवर दाखल केला आहे.

 या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आज आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मुलीची आई काही काळासाठी घराबाहेर गेली होती. तेव्हा आरोपीने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती, त्यामुळे आईला संशय आला.

त्यामुळे पीडितेची आई ही चिमुरडीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेव्हा डॉक्टरांनी मुलीसोबत गैरप्रकार झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस  ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments