Breaking News

संतापजनक! काकानेच केला दोन सख्या पुतणींवर बलात्कार, पोलिसांनी केली दोघांना अटक

 संतापजनक! काकानेच केला दोन सख्या पुतणींवर बलात्कार, पोलिसांनी केली दोघांना अटक


पुणे : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. आता एका नराधम काकाने मित्रांच्या मदतीने आपल्या दोन सख्ख्या अल्पवयीन पुतणींवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार गेल्या 20 ते 22 दिवसांपासून सुरू होता. यातील एका पीडित मुलीचे वय 14 असून दुसऱ्या पीडित मुलीचे वय 10 असून त्या दोघी बहिणी आहेत. 

या दोन्ही मुलींचे आई-वडील काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. मुली लहान असल्या कारणाने त्यांनी या दोघींना काकाकडे राहण्यास पाठवले होते. दरम्यान घरी असताना काकाने वेळोवेळी या दोन्ही लहान मुलींशी बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवले.

पोलिसांनी केली दोघांना अटक

यावरच हा नराधम थांबला नाही तर त्याच्या मित्रानेसुद्धा या दोन्ही मुलींशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रकार सुरू होता. या घटनेनं सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. 

हा सगळा प्रकार एका समाजसेविकेने पोलिसांना सांगताच पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध घेतला आणि यातील दोघही जणांना अटक केली आहे. खडक पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नाईक अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments