google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चहा बनवतानाच मोठा अनर्थ घडला; पती-पत्नीसह 4 मुलांचा होरपळून मृत्यू

Breaking News

चहा बनवतानाच मोठा अनर्थ घडला; पती-पत्नीसह 4 मुलांचा होरपळून मृत्यू

 चहा बनवतानाच मोठा अनर्थ घडला; पती-पत्नीसह 4 मुलांचा होरपळून मृत्यू

देशात दिवसेदिवस अनेक दुर्घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी स्फोट झाल्याच्या घटना समोर येत असतात. यातच आता एका कुटुंबासोबत सकाळच्या सुमारास एक भयानक घटना घडली.

सकाळी चहा बनवत असताना या कुटुंबासोबत ही दुर्घटना घडली. हरियाणातील पानिपत येथून ही मोठी दुर्घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, तत्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अधिकारी छतावरून दरवाजा तोडून आत शिरले.

तसेच अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. तसेच कोणालाही घरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिचपडी गावातील गल्ली क्रमांक चारमध्ये ही घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. गॅस सिलिंडरला आग लागली तेव्हा ते स्वयंपाक करण्याच्या तयारीत होते.

आग इतकी वेगाने पसरली की त्यांना आतून बाहेर पडण्याची किंवा आवाज करण्याची संधीही मिळाली नाही.गुरुवारी तहसील कॅम्प येथील राधा कारखान्याजवळ एका घरातील गॅस सिलिंडर गळतीमुळे संपूर्ण घराला आग लागली. त्यावेळी घरात पती-पत्नी आणि चार मुले उपस्थित होती. या अपघातात संपूर्ण कुटुंब जळून खाक झाले.

Post a Comment

0 Comments