शिंदेसाहेब आदर्श विद्यालयत वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात.
सांगोला (प्रतिनिधी)सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात सन 2022 -23 चे वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद , राष्ट्रमाता जिजाऊ, सरस्वती व संस्थापक वामनराव शिंदेसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे डॉ कीर्तीकुमार शिंदे व शालिनी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्षा श्रीमती. कौशल्यादेवी शिंदे मॅडम, ऐश्वर्या देशपांडे ,प्रमिला जगदाळे, प्रफुल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन प्रशालेच्या वतीने करण्यात आले .यावेळी विविध गुणदर्शन या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कीर्तीकुमार शिंदे यांच्या हस्ते व्यासपीठाला पुष्पहार समर्पित व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या दिवसभरातील विविध गुणदर्शन कार्यक्रमात देशभक्तीपर, पारंपारिक नृत्य हिंदी व मराठी गीतांवर बहारदार नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले. उपस्थितांकडून दाद मिळवली ,कार्यक्रमाचे अहवाल वाचन नीलकंठ शिंदे सर ,प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले
सूत्रसंचालन सुवर्णा इंगवले व आभार संतोष कुंभार सर यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. यावेळी पालक व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने कार्यक्रम पाहण्यासाठी हजर होत्या.



0 Comments