अनिल देशमुखांचा जामीन रद्द?; CBI ने केली ‘हि’ विनंती!
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई हायकोर्टाने सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला.
मात्र, देशमुखांना जामीन मंजूर होताच, त्यांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती सुद्धा देण्यात आली.माहितीनुसार, सीबीआयने देशमुख यांच्या जामीनाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं हायकोर्टाला सांगितलं.
यासाठी १० दिवसांचा स्थगिती या निर्णयावर द्यावी, अशी मागणी सीबीआयने केली. दरम्यान, सीबीआयच्या विनंती मान देऊन न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.सीबीआयच्या विनंतीवरून अनिल देशमुख यांची १० दिवसांसाठी तुरूंगातून सुटका होणार नाही.


0 Comments